ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

व्हीएसआर कंपनीला कुणीतरी वाचवतंय!:तपास खोलवर झाला पाहिजे, अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांनी व्यक्त केली शंका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मी काही VSR आणि डीजीसीएच्या विरोधात नाही, त्यांचे आणि माझे काही वैर नाही. अजित पवारांचा जो अपघात झाला त्यामध्ये जे विमान होते ते VSR चे होते, डीजीसीए हे तपास यंत्रणेमार्फत तपास होत आहे, यामध्ये खोलवर गेल्याशिवाय काय ते कळणार नाही. व्हीएसआर कंपनीला कोणीतरी वाचवतंय याचा अंदाज आम्हाला येत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार म्हणाले की, जर व्हीएसआर (VSR) कंपनीला वाचवण्यासाठी काही मोठ्या आणि ताकदवान व्यक्तींकडून मदत केली जात असेल, तर हा नेमका अपघात आहे की घातपात, याचा तपास योग्य पद्धतीने होणार नाही. हा तपास योग्य रीतीने पूर्ण होण्यासाठी त्याकडे ‘क्रिमिनल’ आणि ‘तांत्रिक’ अशा दोन्ही अँगलने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित कंपनीने अहवालात हे विमान Learjet 45 XR असल्याचे मान्य केले आहे. ज्यावेळी हा प्रसंग घडला, तेव्हा विमानात 90 टक्के इंधन भरलेले होते. हे विमान पूर्वी सुरतला गेले होते. विशेष म्हणजे, रनवे 29 वर उतरण्याची अधिकृत परवानगी असताना, विमान रनवे 11 वर उतरवण्याचा प्रयत्न का झाला? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अहवालात अनेक चुका रोहित पवार म्हणाले की, विमान अपघातासारख्या संवेदनशील प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने होणे अपेक्षित असताना, तपास यंत्रणेने तयार केलेल्या अहवालात अनेक प्राथमिक आणि तांत्रिक चुका आढळल्या आहेत. यावरून आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अहवाल तयार करण्यासाठी महिनाभराचा वेळ घेऊनही त्यात बारामतीला ‘जिल्हा’ दाखवण्यात आले आहे, तसेच तिथे ‘महानगरपालिका’ (मनपा) असल्याचा चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये विमान डाव्या बाजूला पडल्याचे स्पष्ट दिसत असताना, अहवालात मात्र त्याबाबत चूक करण्यात आली आहे. हे विमान अनेक झाडांना धडकून खाली पडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे, जे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे रोहित पवारांचे म्हणणे आहे. अहवालात म्हटलंय की विमान झाडांना धडकून पडलं, पण प्रत्यक्षात तिथं झाडं कुठे आहेत? तिथं केवळ छोटी झुडपं आहेत. झुडपाला साधं विमान टचही झालेलं नाही. झाडांची उंची आणि विमानाची उंची यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. केवळ रिपोर्ट द्यायचा म्हणून आणि अपघाताची जबाबदारी झाडांवर ढकलून देण्यासाठीच AAIB कडून असा दिशाभूल करणारा अहवाल तयार करण्यात आला. विमानतळाची रेकी करण्यात आल्याचा दावा रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी रेकी करण्यासाठी तिथे काही लोकं आली होती असे स्थानिकांनी सांगितल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे, याचा तपास झाला पाहिजे याकडे सीआयडी आणि सीबीआयने थोडेसे लक्ष घालावे असे आमचे मत आहे. VSR कंपनीच्या विमानाचा 2023 मध्ये अपघात झाला होता त्यावेळी एका व्यक्तीचे नाव तपास अधिकारी म्हणून लिहण्यात आले होते. पण अजित पवारांच्या अपघाताच्या अहवालात कोणत्याही तपास अधिकाऱ्यांचे नाव नाही. कारण ते घाबरले असतील कारण कागदपत्रांची हेराफेरी आणि इतक्या गोष्टी होणार आहे, त्यामुळे नावच देऊ नका म्हणजे त्यांच्यावर कोणी आक्षेपच घेणार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर