ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के…

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


India vs west Indies T20i : टीम इंडियाचा माजी कॅप्टन सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियामधून बाहेर आहे. सूर्यकुमारची टीम इंडियाची कॅप्टन्सी गेली तरी त्याचं टीम इंडियावरचं प्रेम कमी झालं नाही. सूर्या सध्या मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या टीममधून देखील बाहेर झाला आहे. अशातच आता सूर्यकुमार यादवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूर्याच्या पत्नीने इन्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून सूर्याने इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिजच्या मॅचवर आपली भविष्यवाणी केली होती.
सूर्या स्वत:शीच बडबड करत बसला…
सूर्यकुमार यादवच्या पत्नीने व्हिडीओ शेअर केला. हा माणूस इथं मॅच बघत बसलाय. तो स्वत:शीच बडबड करत बसलाय. तू काय म्हणत होतास? असा प्रश्न सूर्याच्या पत्नीने त्याला विचारला. त्यावर सोफ्यावर बसलेल्या सूर्याने उत्तर दिलं. मी म्हणत होतो की, आता पाच ओव्हर राहिले आहेत. तर कुणाला बॉलिंग दिली जाईल, याचा मी विचार करत होतो, असं सूर्या पत्नीला म्हणाला. 250 डिफेन्ड होतील का? असा प्रश्न विचारल्यावर… व्हायला पाहिजेत, असं सूर्याने उत्तर दिलं.

ड

View this post on Instagram

A post shared by Phoenix   (@phoenixnationx)

एक ओव्हर टाकणार गुड्डू…
कुलदीप आणि अक्षरविषयी मी बोलत होतो. पाच ओव्हर बाकी आहे. त्यातील एक ओव्हर टाकणार गुड्डू, एक ओव्हर टाकणार पटेल… एक ओव्हर टाकणार आपले पाजी.. असं म्हणत सूर्याने अर्शदीप सिंगची नक्कल देखील केली. मग राहिले दोन ओव्हर.. त्यातली एक ओव्हर मयंक यादव आणि 20 वी ओव्हर टाकणार आपला जाएन्ट शिवम दुबे… असं सूर्या म्हणाला.

IND vs WI : रूदरफोर्डची विकेट अन् 14.1 ओव्हरला फिरली मॅच मग टीम इंडियाची नेमकी चूक कुठं झाली? वेस्ट इंडिजच्या कॅप्टनने सांगितला टर्निंग पाईंट!
अपने ही बंदे हे यार…
तू का एवढं मॅच लावून बसलाय, असा प्रश्न सूर्याला पत्नीने विचारल्यावर.. अपने ही बंदे हे यार… असं उत्तर सूर्याने दिलं. मी इथं आल्यावर पाहिलं तू स्वत:शी बोलत होता. तू स्वत:शी का बोलत बसला होता? असा प्रश्न देविशाने विचारल्यावर मी विचार करत होतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. पण सूर्यकुमार यादवचा गुड्डू कोण? असा सवाल विचारला जात आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर