ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

स्केटिंग पटु मनस्विचे मारेगाव शहरा सह ठिकठिकाणी जंगी स्वागत

1.3k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

हिंदवीरत्न,गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तसेच स्केटिंगमध्ये मिळविले अनेक गोल्ड मेडल

अवघ्या दोन तासांत गाठले बोटोणी ते वणी ३० कि.मी अंतर स्केटिंग करत

सुरेश पाचभाई  मारेगाव

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथून निघालेल्या “स्केटिंग फाॅर युवा” ह्या प्रेरणात्मक कार्यक्रमांतर्गत स्केटिंग रॅलीमधिल मुख्य आकर्षण 7 वर्षीय हिन्दरत्न स्केटिंग पटू मनस्विचे आज दिनांक 23 जानेवारी 2025 रोज गुरुवारला बोटोनी ते वणी स्केटिंग दरम्यान बुरांडा बस स्टॉप, खडकी बस स्टॉप व मारेगाव शहरात ठीकठीकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मनस्विने अवघ्या दोन तासात बोटोणी ते वणी हे  ३० कि. मी अंतर गाठले.त्यामुळे सात वर्षीय मनस्विचे तालुक्यात सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे.आज सकाळी बोटोणी येथे 8:45 वाजता तहसिलदार उत्तम निलावाड तथा पोलिस निरीक्षक संजय सोळंखे यांनी “स्केटिंग फाॅर युवा” ह्या प्रेरणात्मक संदेश देणाऱ्या सात वर्षीय हिन्दरत्न स्केटिंग चॅम्पियन मनस्वी व मनस्विच्या स्केटिंग रॅलीला अनेकांच्या उपस्थितीत शुभेच्छा देत हिरवी झेंडी दाखूवन स्केटिंग रॅलीला सुरवात करण्यात आली.

मनस्वीने रोलर स्केटिंग मध्ये अनेक जागतिक विक्रम आपल्या नांवावर केले असून ती जगातील सर्वात लहान गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर असून इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट 2021 , नॅशनल स्केटिंग चॅम्पियन 2023 आणि नुकतेच सुवर्ण पदकाचे शतक पूर्ण केले आहे.

मनस्वीने स्केटिंग रॅली बोटोणी ते वणी 30 कि. मी. लांब अंतर अवघ्या दोन तासात मनस्विने गाठले असून सर्वप्रथम बुरांडा बस स्टॉप येथे असंख्य विद्यार्थी व गावकऱ्यांच्या वतीने मनस्वी चे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर खडकी बस स्टॉप वर गावकरी व विद्यार्थ्यांनी मनस्वी चे स्वागत केले.

मारेगांव येथे रॅलीचे आगमन होताच कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ जनहित कल्याण संघटनेचे पदाधिकारी यानी मनस्विचा शाल श्रीफळ देत सत्कार केला.आंबेडकर चौकात पत्रकार बांधवांनी व ग्रामस्थांनी स्वागत केले. त्या नंतर कला वाणिज्य महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी व शिक्षकवृंदांकडून सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामसेवक संघटनेकडून स्वागत व सत्कार करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर