ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर: सांगोला आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेलगतचा भाग तसा दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. या भागातील बहुतांश तरुण हे शिक्षण घेऊन नोकरी किंवा व्यवसाय हेच मार्ग निवडतात. मात्र, बी. फार्मसीचं शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराची पारंपरिक वाट न धरता महेश धडस यांनी प्रयोगशील शेतीला सुरुवात केली. गावात दवाखान्यांपेक्षा मेडिकल स्टोअर्सची संख्या अधिक असल्याने दोन एकर शेतात ढोबळी मिरची लावली. प्रयोग यशस्वी झाला. मात्र, आता विकत घेऊन पाणी द्यावं लागत असल्याचं महेश यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.

धडस सांगतात की, पिकाची देखभाल पोटच्या मुलाप्रमाणे केली. मात्र, या प्रवासात दुष्काळाचे भीषण संकट समोर उभे ठाकले. शेतातील पिके जगवण्यासाठी महेश यांनी हार मानली नाही. त्यांनी दररोज दोन पाण्याचे टँकर मागवून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे पीक वाचवले आणि फुलवले. त्यांच्या या अखंड मेहनतीला यश आले असून, आतापर्यंत ढोबळी मिरचीचे एकूण तीन तोडे पूर्ण झाले आहेत. यामधून जवळपास 27 टन एवढे विक्रमी उत्पादन निघाले आहे. ही गुणवत्तापूर्ण ढोबळी मिरची आता दिल्ली, आग्रा आणि अगदी नेपाळपर्यंत विक्रीसाठी पाठवली जात आहे.

Success Story : दुग्ध व्यवसाय करावा तर असा, महिन्याला निव्वळ 2 लाख रुपयांचा नफा, सतीश यांनी सांगितला कमाईचा मंत्र

या यशामागे आर्थिक गणिताची मोठी चिंता दडली आहे. दोन एकर ढोबळी मिरचीच्या लागवडीपासून ते टँकरच्या पाण्यापर्यंत महेश यांना तब्बल 11 लाख रुपयांचा  खर्च आला आहे. सध्या दुष्काळी स्थिती असल्याने एक दिवसआड पाणी द्यावं लागतं. त्याचा खर्च सात हजार रुपये असल्याचं महेश सांगतात. बाजारात सध्या ढोबळी मिरचीला चांगला दर मिळत असला, तरी टँकरच्या पाण्यावर झालेला प्रचंड खर्च पाहता मिळालेले उत्पन्न हातात टिकेल की नाही, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सुशिक्षित तरुणाने दुष्काळाशी दोन हात करत उभारलेला हा प्रयोग कौतुकास्पद असला, तरी पाण्याच्या अवाजवी खर्चामुळे शेतीची आर्थिक गणितं कशी कोलमडतात, याचे हे वास्तव उदाहरण ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर