ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

मागील वर्षीची तूर पुन्हा बहरली! शून्य खर्चातील प्रयोगाने शेतकऱ्याने वेधले सर्वांचे लक्ष, कसं केलं व्यवस्थाप…

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमरावती : शेतीतील वाढता खर्च, मजुरांची कमतरता आणि हवामानातील बदल यामुळे शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र मागील वर्षीच्या तुरीच्या झाडांवरच पुन्हा उत्पादन घेण्याचा अनोखा प्रयोग करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. नव्याने पेरणी न करता, बियाण्याचा खर्च टाळत आणि शून्य मशागतीच्या आधारावर बहरलेले तुरीचे पीक सध्या अनेक शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे.

योग्य व्यवस्थापनातून बहरले तुरीचे पीक

अमरावती येथील शेतकरी रवींद्र मेटकर यांनी मागील हंगामातील तुरीची झाडे उपटून न टाकता त्यांचे योग्य व्यवस्थापन केले. काही काळ पाणी बंद ठेवून कमकुवत झाडे नैसर्गिकरीत्या बाद होऊ दिली. त्यानंतर पुन्हा सिंचन सुरू करत जैविक पद्धतीने झाडांची वाढ जोमदार होईल, यासाठी प्रयत्न केले. परिणामी जुन्या झाडांना नवीन फुटवे फुटले असून सध्या सात ते आठ फूट उंच तुरीची झाडे शेतात डोलताना दिसत आहेत.

कोंबड्यांमध्ये होणाऱ्या मोल्टिंग पासून सुचली कल्पना

या प्रयोगामागची प्रेरणा त्यांना स्वतःच्या पोल्ट्री व्यवसायातून मिळाली. कोंबड्यांमध्ये होणाऱ्या मोल्टिंग प्रक्रियेत जुनी पिसे गळून नवीन पिसे येतात आणि त्यानंतर कोंबड्या पुन्हा जोमाने अंडी देऊ लागतात. याच संकल्पनेवर आधारित विचार करून तुरीच्या झाडांनाही नव्याने वाढण्याची संधी दिल्यास पुन्हा उत्पादन मिळू शकते, असा प्रयोग त्यांनी प्रत्यक्ष शेतात राबवला.

शून्य खर्चात होणार तुरीचे भरघोस उत्पादन

पीक जोमदार करण्यासाठी अंडी, ताक, गूळ, चुना आणि तुरटीपासून तयार केलेले जैविक पंचामृत तसेच इतर सेंद्रिय फवारण्यांचा वापर करण्यात आला. त्यामुळे झाडांना मोठ्या फांद्या फुटल्या असून पिकाची वाढ समाधानकारक झाल्याचे मेटकर सांगतात.

या प्रयोगामुळे नव्याने बियाणे खरेदी, पेरणी, मशागत आणि सुरुवातीच्या खर्चाची मोठी बचत झाली आहे. मागील वर्षीइतकेच नव्हे, तर त्यापेक्षा अधिक उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या काळात कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवण्याचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर