ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 2 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Rahul Gandhi | CM Fadnavis ✦ ⚡ Australia Cricket : 8 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया टीममध्ये फिरली भाकरी! ODI आणि T20 टीमची घोषणा, नव्या चेहऱ्यांना… ✦ ⚡ दुष्काळी बीडच्या शेतकऱ्याची कमाल, 3 एकरात लावलं पैशाचं पीक, योग्य नियोजन अन् वर्षात मालामाल, Video ✦ ⚡ दिवसा काम करून रात्र शाळेत शिकायचा, बारावीचा पेपर अवघड गेला अन्…, ‘ते’ दृश्य पाहून आईचा आक्रोश, सांगलीत ह… ✦ ⚡ CNG Price Hike: LPG नंतर सीएनजीचा भडका! पेट्रोल आणि गॅसच्या दरात किती फरक? पाहा मुंबईतील आजपासूनचे नवे दर ✦ ⚡ IND vs NZ : 4,4,6,6,4,6,4,4… कॅप्टन केलं अन् फॉर्म गेला, पण Dhruv Jurel ने ‘सेंच्युरी’ ठोकून रोखली ऋषभ पं… ✦ ⚡ वडिलांनी गाडी घेऊन दिली नाही, 15 वर्षांच्या मुलाचं टोकाचं पाऊल, घरात गेला अन्…, सिंधुदुर्गात हळहळ ✦ ⚡ लंडनमध्ये असल्याचं भासवलं अन् गुपचूप पुण्यात आली, मुग्धा फ्लॅटवर काय करत होती? कुटुंबापासून लपवलं सिक्रेट, … ✦ ⚡ चार महिन्यांची गर्भवती, पती माहेरी भेटायला आला अन् मध्यरात्रीच नको ते घडलं, छ. संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ ✦ ⚡ PM Kisan: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! आज खात्यावर जमा होणार 2000 रुपये
SP News Maregaon

वडिलांनी गाडी घेऊन दिली नाही, 15 वर्षांच्या मुलाचं टोकाचं पाऊल, घरात गेला अन्…, सिंधुदुर्गात हळहळ

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सिंधुदुर्ग: वडिलांनी नवीन गाडी घेऊन न दिल्याच्या रागातून 15 वर्षांच्या मुलाने आयुष्य संपवलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली. युवराज विजय परब (वय 15, रा. मेहनील प्लाझा, कुडाळ) असं मृत मुलाचं नाव आहे. त्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनं परब कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली येथील शिरवलचं परब कुटुंब सध्या कुडाळमध्ये वास्तव्यास आहे. 15 वर्षे 9 महिने वय असणारा युवराज हा वडिलांकडे गाडी मागत होता. मात्र, तो वयाने लहान असल्याने वडिलांनी गाडी घेण्याचे टाळत त्याला नकार दिला. तेव्हा गुरुवारी रात्री 10.30 ते 11.30 च्या सुमारास युवराजने टोकाचा निर्णय घेतला.

स्वत:ला कॅन्सर झाल्याचा संशय, मुलाचं काय होणार? बापाच्या कृत्यानं सातारा हादरलं, आता जन्माची अद्दल

वडिलांनी गाडी घेण्यास नकार देताच युवराजने राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला ओढणीने गळफास लावून घेतला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडील विजय विद्याधर परब यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, अवघ्या 15 वर्षांच्या मुलाने नवीन गाडीसाठी टोकाचं पाऊल उचलल्याने परब कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर