बातमी ऐका (Marathi Voice Reader)
India A vs New Zealand A : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. कॅप्टन ध्रुव जुरैल याच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळवली जातीये. अशातच या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात कॅप्टन ध्रुवने कमाल करून दाखवली. क्राइस्टचर्च येथे सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात इंडिया ए संघाने न्यझीलंड ए संघाविरुद्ध पहिल्या डावात 346 धावा केल्या. यामध्ये कॅप्टन ध्रुव जुरैल याने 171 बॉलमध्ये 105 रन्सची वादळी खेळी केली.
4 तास 7 मिनिटं बॅटिंग…
4 तास 7 मिनिटं बॅटिंग करत ध्रुव जुरैलने झुंज दिली अन् शतक ठोकलं. यावेळी त्याने 11 फोर अन् तीन खणखणीत सिक्स देखील ठोकले. 219 वर 7 विकेट्स अशी टीम इंडियाची परिस्थिती होती. तिथून ध्रुवने बॅट उचलली अन् मोठं आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवलंय. जुरेलने त्याचं 8 वं फर्स्ट क्लास क्रिकेटमधील शतक झळकावलं. तर 9 व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या आकाश दीपने 68 धावा करून आपली सर्वोच्च फर्स्ट क्लास इनिंग नोंदवली. त्यामुळे आता जखमी ऋषभ पंतला सावण्यास वेळ मिळाला तरी हरकत नाही. टीम इंडियाचे विकेटकीपिंगचं टेन्शन मिटलं आहे.
SA vs AUS : साऊथ अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला दिले ‘धक्क्यावर धक्के’, सिरीज जिंकताच ICC ने केला मोठा उलटफेर!
आकाश दीपसोबत आठव्या विकेटसाठी भागीदारी
ध्रुव जुरैलने एकहाती मॅच सावरली होती. त्याने मानव सुथारसोबत सातव्या विकेटसाठी 97 बॉलमध्ये 52 धावा जोडल्या. त्यानंतर त्याने आकाश दीपसोबत आठव्या विकेटसाठी मोठी भागीदारी केली. या दोघांनी 142 बॉलमध्ये 75 धावा जोडल्या. त्यामुळे टीम इंडियाला मोठा स्कोर उभा करता आला. मात्र, टीम इंडियासमोर सर्वात मोठी अडचण म्हणजे सलामीवीर यशस्वी जयस्वाल.. त्याला मागील तिन्ही डावात चांगली कामगिरी करता आली नव्हती. ध्रुव जुरैल मागील तिन्ही इनिंगमध्ये फेल गेला होता. आता त्याने सेंच्युरी ठोकली आहे.
न्यूझीलंड13 वर 3 आऊट
दरम्यान, न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. 13-3 अशी परिस्थिती न्यूझीलंडची झाली होती. मोहम्मद सिराजने 5 व्या ओव्हरमध्येच विकेट काढून दाखवली. त्यानंतर मुकेश कुमारने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतले अन् सर्वांना चकित केलं होतं. त्यानंतर आता शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंड 105-3 अशा स्थितीत होती.