ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

धडाकेबाज कारवाई : नागपूर–हैदराबाद महामार्गावर गोवंश तस्करीचा पर्दाफाश

5 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

14 बैलांची सुटका, 3 मृत अवस्थेत आढळले

तालुका प्रतिनिधी पांढरकवडा सागर मुंडे

पांढरकवडा: नागपूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनावर पांढरकवडा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत 14 बैलांची सुटका केली. या कारवाईत तस्करीसाठी वापरलेले आयचर वाहनासह एकूण 17 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नागपूरहून हैद्राबादकडे कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन जाणारे वाहन येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार आज 10 मार्च रोजी पहाटे 4 वाजता पांढरकवडा पोलिसांनी का कोघारा फाटा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 येथे सापळा रचला. काही वेळातच आयचर क्र. MH 40 CM 3230 हे वाहन नागपूरकडून येताना दिसताच पोलिसांनी त्याला अडवून तपासणी केली.

तपासणीदरम्यान वाहनामध्ये 17 गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबून ठेवलेली आढळली. बैलांच्या मानेत आकूड दोऱ्या बांधून पाय घट्ट बांधण्यात आले होते. यात 14 बैल जिवंत तर 3 बैल मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी पोलिसांनी
मोहम्मद रिजवान रफिक शेख (32, नागपूर)
अब्दुल रफिक अब्दुल कादिर कुरेशी (30, नागपूर)
मोहम्मद जुनेद अब्दुल कादिर (32, वणी)
सदू उर्फ सद्दाम कुरेशी (34, नागपूर)
निखील डोरले (भंडारा)
यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सुमारे 2 लाख 59 हजार रुपये किमतीचे 17 बैल आणि 15 लाख रुपये किमतीचे आयचर वाहन असा एकूण 17 लाख 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिवंत 14 बैलांना सुरक्षिततेसाठी नगरपरिषद पांढरकवडा कोंडवाड्यात ठेवण्यात आले असून मृत 3 बैलांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करून त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 1995), प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता,

अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लहु तावरे, पोउपनि. सचिन रघुपती, पोहेकॉ राम राठोड, विलास जाधव, रजनीकांत पाटील व सुनील राठोड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.नागपूर–हैदराबाद महामार्गावर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गोवंश तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर