ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शेतीच्या वादातून सखी बुद्रुक येथे 40 वर्षीय इसमाची हत्या.

135 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

20 ऑगस्ट ला गावालगतच्या तलावात आढळून आला होता मृतदेह.

केळापुर तालुका प्रतिनिधी :- सागर मुडे
[ 9822147144 ]

केळापुर तालुक्यातील सखी बुद्रुक येथे 20 ऑगस्ट 2022 ला गावालगतच्या तलावात अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याचे पादचारी शेतकऱ्यांला दिसून आल्याने एकच खळबळ उडाली होती. शेतकऱ्यांने सदर माहिती गावातील लोकांना दिली त्यापश्चात घटनेची माहीती पांढरकवडा पोलिसांना देण्यात आली होती. मात्र मृतदेह हा गावातीलच बाबाराव दौलत मेश्राम वय 40 राहणार सखी बुद्रुक याचा असल्याचे निष्पन्न झाले होते.

मृतकं 10 दिवसापासून बेपत्ता होता मात्र 20 ऑगस्ट ला त्याचा मृतदेह तलावात मिळाल्याने मृतकाच्या पत्नीने संशय घेत जुन्या वादाचा उल्लेख करताच. पांढरकवडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संदीप बारींगे व सहकाऱ्यांनी तपास चक्रे फिरवत गावातीलच संशयित आरोपी भीमराव अर्जुन मेश्राम वय 42 राहणार सखी बुद्रुक याला अटक करण्यात आली. खात्रीपूर्वक विचारपूस केली असता संशयित आरोपी भीमराव मेश्राम याने आपण दिनांक 10 ऑगस्ट 2022 ला शेतीच्या वादातुन घटनेच्या दिवशी आपणच काठीने मारहाण केल्याचे मान्य केले.

23 ऑगस्ट मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर अजून रितसर विचारपूस करनार असल्याचे माहिती आहे. सदर कार्यवाही उप विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, जगदीश मंडलवार पोलीस निरीक्षक पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप बारींगे, बिट जमादार प्रमोद जुनुनकर , शशीकांत चांदेकर हे अधिक तपास करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर