ब्रेकिंग न्यूज
मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी? Babar Azam : ‘माझ्यासाठी देखील ही न्यूज होती…’, 7 खेळाडूंच्या हकालपट्टीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवा ड्… सोशल मीडियावरील Video पाहिला, नवीन पद्धतीनं केली दोडका शेती, लाखात झाला नफा मुंबईतून कोकणचा प्रवास सोपा, आता रोज धावणार CSMT-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस, वेळापत्रक, थांबे आणि संपूर्ण माह…
SP News Maregaon

पार्डीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील पार्डी येथे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार (दि. 21 एप्रिल 2026) रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव कैलाश चंद्रभान गाडगे (वय 55, रा. पार्डी, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) असे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार असून ते सुमारे अडीच एकर शेतीवर उदरनिर्वाह करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडगे हे मंगळवारी सकाळी “शेतातील पराठ्या (पिकाचे अवशेष) जमा करण्यासाठी जातो” असे सांगून घराबाहेर पडले होते. बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन शोध घेतला असता, ते लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही बाब समोर येताच कुटुंबीयांनी आक्रोश केला आणि गावावर शोककळा पसरली.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, पोलीस संभा लेनगुरे करीत आहेत.

आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आर्थिक अडचणी, शेतीतील अनिश्चितता किंवा इतर वैयक्तिक कारणांचा तपास पोलीस करीत आहेत. सततच्या संकटांनी ग्रासलेल्या शेतकरी वर्गातील ही आणखी एक दुर्दैवी घटना ठरत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर