ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

IND vs SL : मोहम्मद सिराजची चूक अन् गोळीच्या स्पीडने ‘हेड शॉट’, थोडक्यात वाचला अंपायरला; जडेजाच्या काळजाचा …

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


India vs Sri Lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 462 धावांचा डोंगर उभारल्यानंतर श्रीलंकेची टीम पहिल्या डावात 284 धावांवर कोलमडली. त्यानंतर टीम इंडियाला आता पहिल्या डावानंतर 178 धावांची आघाडी मिळाली आहे. अशातच आता टीम इंडिया बॅटिंगला येणार असून चौथ्या दिवशी आक्रमक बॅटिंग पहायला मिळू शकते. पण तिसऱ्या दिवशी असं काही घडलं की, सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. जडेजा देखील थक्क झाल्याचं पहायला मिळालं.
बॉल डोक्यावर परफेक्ट बसला असता पण…
रॉड टकर मैदानात न आल्यामुळे अहसान रझा पर्यायी अंपायर म्हणून मैदानावर होते. अहसान रझा लेथ अंपायर म्हणून उभे होते. त्यावेळी रविंद्र जडेजा मैदानात होता. जडेजाच्या बॉलिंगवर बॅटरने डीपकडे बॉल मारला अन् तिथं मोहम्मद सिराज उभा होता. सिराजने चपळाईने बॉल पकडला अन् थ्रो केला. त्यावेळी थ्रो लेग अंपायर अहसान रझा यांच्या डोक्यावर परफेक्ट बसला असता पण रझा झाली झुकले अन् वरून बॉल गोळीच्या स्पीडने गेला. अंपायर चपळाईने बाजूला अन् जीव वाचला. नाहीतर ही क्रिकेटमधील सर्वात मोठी दुर्घटना ठरली असती.

Siraj, aaraam se! Ek umpire toh pehle hi sub ho chuke hain!
Watch #SLvIND, 1st Test | Day 3, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/ghiCeM6mDx

— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 17, 2026

जडेजाची रिर्अॅक्शन
थ्रो परफेक्ट स्टंप्सवर नव्हता. रविंद्र जडेजाने बाजूला जाऊन थ्रो कलेक्ट केला. त्यानंतर जडेजाच्या काळजाचा देखील ठोका चुकला. जडेजाची रिर्अॅक्शन यावेळी सगळं काही सांगत होती. तर सिराजला देखील आपली चूक कळाली होती. दरम्यान, पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मानव सुथार आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून सात विकेट्स नावावर केले आहेत. स्पिनर्सचे बॉल वळत असताना दोघांनी श्रीलंकेला गुडघ्यावर आणलं.
सोनल डिनूशा याचं शतक
कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतले. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव 284 डावावर कोलमडला. 90 वर पाच विकेट असताना टीम इंडियाला श्रीलंकेला लवकर आऊट करता आलं नाही. सोनल डिनूशा याने शतक ठोकलं तर निरोशान डिकवाला याने 80 धावांची खेळी केली होती. त्यामुळे श्रीलंकेला जीवदान मिळालं.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर