ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पाटणबोरीतून पिंपरीकडे जाणारी अवैध दारू वाहतूक उघडकीस

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पांढरकवडा पोलिसांची धडक कारवाई; 1.65 लाखांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा तालुका प्रतिनिधी सागर मुडे

पाटणबोरी येथून पिंपरीकडे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ऑटोवर पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत एकूण 1 लाख 65 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवार, दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली असून, एका ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शोध पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाटणबोरी येथून पिवळ्या रंगाचा ऑटो (क्र. AP-01 TA-0072) अवैधरित्या देशी दारू घेऊन पिंपरीकडे जात आहे. माहिती खात्रीलायक असल्याने पोलिसांनी तत्काळ सापळा रचून सदर ऑटो अडवला.

ऑटोची झडती घेतली असता मागील बाजूस खाकी रंगाचे चार बॉक्स आढळून आले. पंचासमक्ष तपासणी केली असता प्रत्येक बॉक्समध्ये 48 प्रमाणे एकूण 192 सिलबंद पव्वे ‘बॉबी संत्रा’ देशी दारू (180 मि.ली.) आढळून आली. प्रत्येकी 80 रुपयांप्रमाणे दारूची एकूण किंमत 15,360 रुपये इतकी आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ऐपे कंपनीचा ऑटो रिक्षा (अंदाजे किंमत 1,50,000 रुपये) जप्त करण्यात आला.

या प्रकरणी विठ्ठल लच्छमन्ना बासावार (वय 47, रा. वठोली, ता. झरी, जि. यवतमाळ) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकातील पोउपनि नितीन सुशीर, विलास जाधव, सचिन काकडे, संदीप मडावी व राजू मुत्यालवार यांनी ही यशस्वी कारवाई केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर