ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

लग्नाचे आमिष दाखवून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

102 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील श्रीरामपुर येथील एका 23 वर्षीय युवकाचे तालुक्यांतील एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत मागील 2 वर्षापासुन प्रेम संबंध होते.

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील श्रीरामपुर येथील राजकुमार रामभाऊ मेश्राम वय सुमारे 23 वर्ष ह्या युवकाचे तालुक्यांतील एका गावातील अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध होते. राजकुमार हा त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून व अज्ञानाचा गैरफायदा घेऊन गावाशेजारी असलेल्या त्याच्या आजीच्या शेतात नेवुन त्या मुलीसोबत जबरदस्तीने अत्याचार करत होता.

वारंवार अत्याचार केल्याने अल्पवयीन 16 वर्षीय मुलगी ही 4 महिन्यांची गर्भवती झाली आहे. ही मुलगी तालुक्यातील एका गावात राहते. व एका कॉलेज मध्ये 11 व्या वर्गा मध्ये शिक्षण घेत आहे.त्या मुलींच्या घरच्यांनी समाजात बदनामी होईल या भितीने आज पर्यंत पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला नव्हता. ही घटना मारेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत श्रीरामपुर येथील गावाशेजारी असलेल्या संशियताच्या आजीच्या शेतात घडली.

याबाबत काल दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोज शनिवारला सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी संशियत आरोपी राजकुमार रामभाऊ मेश्राम वय सुमारे 23 वर्ष याच्यावर कलम- 376,376(1)(A),376(2)(J,N) 4,6 बाललैलिक अत्याचार (पोक्सो ) सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल  करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर