ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

बुरांडा ते खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका

101 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– रस्त्यात गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य
– अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त
– लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

सुरेश पाचभाई मारेगांव,

मागील अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत असलेला बुरांडा ते खापरी या रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे. या रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उखळून असल्याने येथील नागरिकांना या रस्त्याने चालतांना नरकयातनाच भोगत असल्याचा भास होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षातही नागरिकांचे हाल मात्र कमी नाही.

मारेगाव तालुक्यातील खापरी येथे जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असुन हा अखेरची घटका मोजत आहे. बुरांडा ते खापरी हा अडीच किमीचा रस्ता आहे. त्यापैकी जवळपास दोन किमीच्या रस्त्याचे काम पंधरा वर्षानंतर अर्धवट काम झाले आहे.अर्धा किमीच्या रस्त्याचे काम बाकी आहे.पावसामुळे अर्धा किलो मीटर रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की वाहन तर दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या खापरी ते बुरांडा रस्ता हा गेल्या वर्षी पंधरा वर्षांनंतर तयार करण्यात आला आहेत.पण तो ही केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे.गावात चार चाकी वाहन येणे तर दुरच राहिले एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला येथुन तालुक्याच्या ठिकाणी येण्यास मोठी कसरत करावी लागते.आणि बाहेरगावी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना गिट्टी व खड्यामुळे अथक त्रास सहन करावा लागतो आहे.


सन 2021- 2022 च्या मे महिन्यात अडीच की.मी.पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे अर्धवट काम करण्यात आले होते.उर्वरित अर्धा की.मी.रस्ता पूर्णताहा उखडून मोठ मोठे खड्डे तयार झाले आहे.या रस्त्याने पायदळ चालने सुद्धा कठीण बाब आहे.अर्धवट काम झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याने ये -जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असुन उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी गावातली नागरिकांनची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर