कर्तव्यावर शहीद ठाणेदाराला पोलिस दलाची अश्रुपूर्ण श्रद्धांजली

वणी येथील SDPO कार्यालयात ठाणेदाराला अखेरची सलामी सुरेश पाचभाई मारेगाव वणी :कर्तव्यनिष्ठ, जनतेशी आपुलकीनं वागणारे आणि सहकाऱ्यांचे खरा मार्गदर्शक ठरलेले मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण यवतमाळ पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता वणी येथील SDPO कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्रद्धांजली सभेत वरिष्ठ … Read more

कपाशीवरील आकस्मिक मर रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाचा सल्ला

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: गेल्या आठवड्यात  झालेल्या सततच्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कापसाच्या झाडाची पाने मलूल होऊन झाडणे मान टाकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत. ही आकस्मिक मर विकृती असून यामुळे प्रादुर्भाग्रस्त झाडे पूर्णत: वाळण्याची शक्यता असते. जमिनीत वाफसा नसल्यामुळे आकस्मिक मर प्रादुर्भावग्रस्त झाडांमध्ये मुळाद्वारे अन्नद्रव्ये शोषण होत नाही. त्यामुळे झाडे कोमेजतात. पाऊस पडल्यानंतर ३६-४८ तासांत … Read more

बैलांच्या सन्मानाचा दिवस : तालुक्यात पोळा उत्साहात साजरा

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव:शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक आणि ग्रामीण संस्कृतीचे वैभव मानला जाणारा बैलपोळा उत्सव तालुक्यात शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात व पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य सोबती असलेल्या बैलांच्या सन्मानाचा हा दिवस असल्याने ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार शेतकरी आपले बैल स्नान घालून आकर्षक सजावट करतात. गळ्यात … Read more

हिवरीत केशर आंबा लागवड उपक्रमाचा शुभारंभ

प्रगतशील शेतकरी रमेश पिदुरकर यांचा पुढाकार – मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण सोहळा सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यातील हिवरी गावात प्रगतशील शेतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. गावातील प्रगतशील शेतकरी श्री. रमेश श्रीराम पिदुरकर यांच्या शेतात बुधवारी (दि. 20 ऑगस्ट 2025) दुपारी 3 वाजता केशर आंब्याची लागवड करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वृक्षारोपण सोहळ्याला तालुका कृषी … Read more

मारेगाव पोलीस ठाण्यात 200 झाडांचे वृक्षारोपण

ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: पर्यावरण संवर्धनाचा संकल्प ठेवत मारेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी, बुधवार सकाळी 10:30 वाजता भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व … Read more

मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेसाठी ठाम निर्धार सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव : “उत्सव हा आनंदाचा, पण शांततेतूनच खरी गोडी,” या संदेशाने मारेगाव पोलिस स्टेशन येथे आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता शांतता समितीची सभा पार पडली. पोळा, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव व ईद-ए-मिलाद या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा ठाम निर्धार … Read more

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत हटवांजरीच्या जीवनविकास विद्यालयाच्या मुलींचा धडक विजय

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव: जीवनविकास विद्यालय, हटवांजरी येथील १७ वर्षीय मुलींच्या कबड्डी संघाने तालुका स्तरावरील कबड्डी स्पर्धेत दमदार कामगिरी करून भक्कम विजय मिळवला असून आता या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. या स्पर्धेत सुरुवातीपासूनच हटवांजरीच्या खेळाडूंनी शिस्तबद्ध व आक्रमक खेळ सादर केला. उत्कृष्ट बचाव आणि चढाईच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना झुंजार प्रत्युत्तर देत … Read more

मारेगावच्या आठवडी बाजारात पोळ्याचा जल्लोष

सर्जाराजाच्या साजाला महागाईची झळ सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : शेतकऱ्याच्या श्रमांचा सखा असलेल्या बैलाला कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा.अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या या सणाच्या पार्श्वभूमीवर मारेगावच्या आठवडी बाजारात प्रचंड गर्दी उसळली होती. रंगीबेरंगी साज-सामानांनी बाजार खुलून दिसत असला तरी महागाईच्या झळेमुळे यंदा सर्जाराजाचा साज महागला आहे. दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारला होणाऱ्या बैलपोळ्याच्या … Read more

विजेच्या धक्क्यात युवकाचा मृत्यू

आमदार देरकरांच्या पाठपुराव्याने कुटुंबाला मिळाली आर्थिक मदत सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव : तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील अनिल रमेश फरताडे (वय ३५) या युवकाचा ६ ऑगस्ट रोजी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर मृताच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी पुढाकार घेतला. आमदार देरकर यांनी तातडीने प्रशासनाकडून पंचनामा … Read more

हिवरी येथे सीआरए तंत्रज्ञानाद्वारे फळबाग लागवड

आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत १ हेक्टर क्षेत्रावर चिकू फळपीकाची लागवड करण्यात आली. तालुका कृषि अधिकारी दीपाली खवले यांच्या उपस्थितीत शेतकरी श्री. रमेश वासुदेव कळसकर यांच्या शेतात ही लागवड झाली. या वेळी हवामान अनुकूल सीआरए (CRA) फळबाग लागवड … Read more

error: Content is protected !!