ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

झरी नगर पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्यावर चिखल

103 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

दुर्गापूर वार्ड क्र ४ व ५  मध्ये मुख्य रस्त्यावरून वाहते गटारगंगा

समस्या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी नगरपंचायत क्षेत्रात झरी गावातून ते जामणी,दुर्गापूर व मांगुर्ला निमणी येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गाडेवार कॉम्प्लेक्स च्या समोर पावसाळ्याचे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहेत. त्यामुळे येथून रहदारी करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.येथून जाणारा हा मुख्य रस्ता असून या मार्गे आयटीआय , ग्रामीण रुग्णालय , राजीव माध्यमिक व उच्च माध्यमिक  महाविद्यालय, तलाठी कार्यालय, वि. वि .कार्यकारी  सोसायटी,  दिवानी न्यायालय तालुका कृषी अधिकारी कार्यालय व  वार्ड क्र. १ ते  १३ ला रहदारी साठी हा एकमेव मार्ग आहे.

या मार्गने शालेय विध्यार्थी व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना शासकीय कामासाठी ये- जा करावी लागते. रुग्णांना ग्रामीण रुग्णालय मद्ये सुद्धा याच रस्त्याने जावे लागते, परंतु रस्त्याच्या मधोमध पाणी व चिखल साचल्याने रहदारी करणे कठीण झाले. या रस्त्याने वाहन तर सोडा पण साधे पायदळ चालणे सुध्दा कठीण झाले आहे.शालेय विद्यार्थी पायदळ ये जा करत असताना एखादे वाहन जरी आलेत तरी रस्त्यावरील चिखल उधळून  शाळेचा गणवेश खराब होऊन त्यांना आल्या पावली घरी वापस जावे लागतात .परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे.

पाणी साचल्याने मार्गाचा अंदाज न आल्यामुळे या रस्त्यावर अत्तपर्यंत अनेक किरकोळ अपघात झाले पण दुर्दैवाने मोठी हानी होण्याचे टाळता येत नाही.मागील वर्षा पासून या रस्त्यात दुरुस्ती केली नसल्याने यंदा पावसात या रस्त्यावर पाणी साचून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या दुरुस्ती बाबत नागरिकांनी अनेक वेळा नगरपंचायत प्रशासनाला तोंडी माहिती दिली पण या मुजोर प्रशासनाने नागरिकांना केराची टोपली दाखवली असल्याचे सांगितले जात आहे .

सध्या पावसाळा सुरु झाला असून अनेक साथीचे रोग उद्भवतात, त्यातच या साचलेल्या पाण्यापासून डासाची उत्पत्ती वाढतात.गेल्या अनेक दिवसापासून येथे मुख्यअधिकारी नसल्याने येथील काम प्रभारावर असून नगर पंचायत समस्या कडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.सहा महिन्यांपूर्वी निवडणूक होवून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर विराजमान झाले.समित्यांची निवड झाली परंतु सहा – सात महिने झाले परंतु अजुन कोणत्याही कामाची सुरुवात झाल्याचे दिसून येत नसल्याचे नगरवासी यांचे कडून सांगितले जात आहे .


निवडणूक प्रचारात आश्वासन देणारे प्रतिनिधी आता निवडून आल्यावर समस्याकडे पाहायला त्यांच्याकडे वेळ नाही का ? असा सवाल नागरिक करत आहे.येथील अनेक वार्डात पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या चिखलाची समस्या आहे पण नागरिकांकडून वारंवार सांगूनही समस्याचे निवारण होत नसल्याने जनता त्रस्त झाली आहे. या रस्त्याचे काम त्वरित दुरुस्त न केल्यास जण आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर