ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आर्या इंटरनॅशनल स्कुल,मुकूटबन तर्फे वृक्षारोपण जनजागृती रॅलीचे आयोजन.

99 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै ते ७ जुलै पर्यंत वृक्ष लागवड सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात शासनातर्फे राबविला जातो. त्याच अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे “आर्या इंटरनॅशनल स्कुल, मुकूटबन येथील वर्ग ३ री ते वर्ग १० वीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये मुकूटबन मार्केटमधील प्रत्येक दुकानात एक रोपटे देऊन फायदे सांगून जतन करण्यास सांगितले.तेव्हा सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले.विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आशयाचे पर्यावरण संवर्धन उपदेश देणारे फलक बनवून रॅलीकडे मुकूटबन वासीयांचे लक्ष वेधले.

शाळेतर्फे वन विभाग कार्यालय मुकूटबन येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार सुरेश मस्की यांचे मुख्याध्यापक तथा विद्यार्थ्यांनी रोपटं देऊन स्वागत करण्यात आले.आणि त्याचे वृक्षारोपण पोलीस स्टेशन परिसरात कर्मचाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आले.यावेळी ठाणेदार सुरेश मस्की यांनी सदर उपक्रमाची प्रशंसा केली.

व विद्यार्थ्यांना चॉकलेट देण्यात आले.त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय मुकुटबन येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सरपंच मीना आरमुरवार आणि ग्रामसेवक निखिल येनुगवार ग्रा.प.सदस्य आणि ग्रा प.कर्मचारी उपस्थित होते.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर