ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

तालुक्यातील रस्त्यांच्या समस्याकडे लोकप्रतिनिधींनीचे दुर्लक्ष

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तीस वर्षे लोटूनही मूलभूत समस्या कायम.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी १५ आगस्ट १९९२ साली झरी जामणी  तालुक्याची निर्मिती करण्यात आली . तीन दशक होऊनही  तालुक्यातील रस्ते पाणी , विज , आरोग्य शिक्षण या मूलभूत समस्या सुटलेल्या नाही .
विकासाच्या नावावर करोडो रुपयाचा निधी खर्च केला जात असला तरी त्याच त्या समस्येसाठी तालुक्यातील जनतेला संघर्ष करावा करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे .विकासासाठी रस्ता महत्त्वाचा  आहे . परंतु संपूर्ण तालुक्यात काही मोजके रस्ते सोडले तर ६०% पेक्षा जास्त रस्ते अतिशय खराब आहे .दर्जेदार कामे करण्यात येत नसल्याने वारंवार त्याच कामासाठी वारंवार निधी खर्च होतांना दिसत आहे .


 तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यासह  खेडोपाडी जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय स्थिती अतिशय खराब आहे . मागिल पावसाळा संपल्यानंतर उन्हाळ्यात मे महिन्या पर्यंत अनेक रस्त्यांची कामे होईल अशी तालुक्यातील जनतेची अपेक्षा होती परंतु उन्हाळा संपत आला तरी रस्त्याची कामे केली गेली नाही.फारशी कामे सुरु कुठे दिसत नाही.झरी -जामणी -सालेभट्टी   हा ५ की.मी  तसेच घोन्सा ते येसापूर फाट्यापर्यंत २ किमी रोड खडे पडले आहेत .

दरवर्षी खडे  बुजविण्याच्या नावा खाली  लाखो रुपये खर्च केले जात असले तरी मात्र  दोन महिन्यांत त्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत . मांगुर्ला बु.,  मांगुर्ला खु  , सालोभट्टी – मार्की खु  पाटण – झरी  , खडकी – अडेगांव , चिंघाट – बोपापूर  , मार्थाजून  लांडगी – पोड  , मार्थाजून – बिहाडीपोड  , दाभाडी –  वर्लासा   इ. अनेक रोड संपूर्ण उखळे असून दुचाकी नाही पायदळ चालणे कठीण झाले आहे. गिट्टी उखडून रोडवरील डांबर नाहीसे झाले असून  बैलगाडी घेवून जाताना बैलांच्या पायाला इजा होत असल्याचे सांगण्यात येत आहे .


  अधिकारी व ठेकेदार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे निकृष्ट दर्जाची  कामे केली जात असल्याचे बोलले जाते. यामुळे अल्पावधीतच  रस्ते खराब झाल्याचे दिसून येत आहे .
झरी – दाभाडी निमणी  रोड  चे २०२० जंगलात टप्पा डांबरी करण्यात आले परंतु कोणत्याही प्रकारची अवघड वाहतूक नसतांना दोन वर्षांत रस्ता खराब होत आहे .
रस्त्याच्या समस्येसाठी व निकृष्ट   दर्जाच्या  बांधकाम विरुद्ध  अनेक राजकिय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली  निवेदन दिली.आंदोलन उपोषण करण्यात आली  माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. मात्र चार पाच महीने  झाली त्यांना विसर पडला असून या विषयी कोणीही पाठपुरावा करतांना दिसत नाही .


रस्त्याचा समस्या गंभीर असून खराब रस्त्यामुळे तालुक्यातील बस सेवा दोन वर्षा पासून बंद करण्यात आली आहे .त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे.खाजगी वाहन खेड्यापाड्यात जायला तयार नसून गेले तरी दुप्पट तिप्पट भाडे घेतात . गरोदर स्त्री  , आजारी व्यक्ती  यांना दवाखाना दवाखान्यात घेऊन जाणे कठीण होत आहे . अपघात वाढले  असून अनेकांना पाठीचे , माणेचे दुखणे सुरु झाले आहे .ग्रामीण भागातून शेतमाल नेणे त्रासदायकच असून  ग्रामीण जनतेला  खराब रस्त्यांमुळ आर्थिक भूर्दंड सोसावे लागत आहे .असे असले तरी जनतेच्या समस्येचा लोकप्रतिनिधींना विसर पडल्याचे दिसून येत आहे .



                    “” प्रतिक्रिया “”

मागिल दोन वर्षा पासून सुरु असलेल्या झरी – शिबला –  पांढरकवडा आणि  मुकुटबन पाटण  बोरी रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरण ची कामे कासव गतीने सुरू असल्याने यंदाही पावसाळ्यात या मार्गाने  प्रवास  करताना लोकांचे हाल होणार असल्याने चिन्ह दिसत आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर