ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

खर्च लागला वाडू सांगा घर कुल कस बांधुन काडु…..

90 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

<<>>शासनाने घरकुल अनुदानात वाढ करावी अशी लाभार्थ्यांची शासनाला आर्त हाक<<>

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
यवतमाळ जिल्हातील मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखल्या जातो. या तालुक्यातील बहुतांश कुटुंबे ही फक्त रोजमजुरीवर आपल्या कुटुंबाची उपजीविका भागून आपले जिवन जगत असल्याचे दिसतात. त्यांना राहण्यासाठी साधे घर सुध्दा नाहीत. म्हणून शासनाने प्रत्येकाला हक्काचे घर मिळावेत या करीता तालुक्यातील गावा गावात सर्व्हे करून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेवून खरे गरजू कुटुंबाची यादी तयार करण्यात आली होती. तेव्हां पासून आज पर्यन्त घरकुलची अपेक्षा करीत असणाऱ्यांना काही प्रमाणात प्रत्येक ग्रामपंचायतला पात्र निवड लाभार्थ्यांची यादी येवुन त्यांचे कागदपत्रे जमा करून त्या पात्र लाभार्थ्यांना घरकूलचा लाभ मिळणार आहेत.
ह्या घरूकूल लाभार्थ्यांना फक्त 1,20,000 रुपये एवढेच अनुदान मिळणार असल्याने एवढ्या कमी अनुदानात घरकुल पूर्ण करायचे कसे अशी चिंता वाटायला लागल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहेत.करण असे आहेत की आता रेती,सिमेंट, सलाख, वीटा,व लागणाऱ्या इतरही साहित्याच्या किमतीत खूब मोठ्या प्रमाणात वाढली झाली आहे . याभाव वाढली मुळे घरकुल पात्र लाभार्थ्यांमध्ये चिता वाढल्याचे दिसून येत आहेत. त्यातच घरकुल बांधकाम करणाऱ्या कारागीर-मजुरांचे भाव (मजुरी) सुद्दा खूब महागडी झाल्याणे हा शासनाकडून मिळणारे अल्पसे अनुदान यात खरच आम्हचे घरकुल पूर्ण करतील काय? की “घर उकलून मांडव टाकल्या गत ” परस्थिती तर आम्हाच्या वर येणार तर नाहीत.यांची चिंता सर्वच घरकुल लाभार्थ्यांना लागल्याचे चित्र दिसून येत आहेत.
यवढि भयावह महागाई वाढली ही आम्हच्या शासनाला अजूनही माहीत नसेल काय? या महागाई व अल्पशा अनुदानात खरच आम्हचे घरकुल पूर्ण होतील काय? नाहीतर घर पाडून बेघर होवून उघड्यावर कुटुंबे घेवून राहण्याचीच वेळ येइल काय? असे अनेक प्रश्न आज रोजी घरकुल पात्र लाभार्थ्यांना पडले आहेत.
शासनाने सर्व महागाईचा विचार करून खरच गोरगरिबांना हक्काचे घर पूर्ण होईल, कोणाचेही महागाई मुळे घरकुल अपूर्ण रहाणार नाहीत.या करीता महागाई चा सखोल अभ्यास करून घरकुल अनुदानात वाढ करावीत. नाहीतर सर्व तालुक्यात शासनाला कोणत्याही लाभार्थ्यांचे घर पूर्ण झाल्याचे चित्र दिसणारच नाहीत. या करीता घरकुल लाभार्थी शासनास आर्त हाक देतानी दिसतात….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर