ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

मुक्ता येथील ज्येष्ठ नागरिक सदाशिव जगन्नाथ ढवस यांचे निधन

5 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील मुक्ता येथील ज्येष्ठ व आदर्श व्यक्तिमत्त्व सदाशिव जगन्नाथ ढवस (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने रविवारी दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मुक्ता गावासह परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शांत, कष्टाळू व संस्कारक्षम स्वभावासाठी परिचित असलेले सदाशिव ढवस हे परिसरातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या दीर्घ आयुष्यातून अनेक पिढ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या जाण्याने गावाने एक अनुभवी वडीलधारी व्यक्ती गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता मुक्ता येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते रामाजी सदाशिव ढवस व महादेव सदाशिव ढवस यांचे वडील होते . त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर