वेगाव येथे आज कृषी विज ग्राहक तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.


मारेगाव उपविभागा मधील सर्व कृषीपंप वीजग्राहकांनच्या वीजबिल विषयी व इतर तक्रारींचे निवारण कारण्यात आले.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]


सविस्तर वृत्त असे की.

मारेगांव तालुक्यातील वेगांव येथे आज मंगळवार
दिनांक 15 मार्च 2022 रोजी मारेगाव उपविभागा मधील सर्व कृषीपंप वीजग्राहकांनच्या वीजबिल विषयी व इतर तक्रारींचे निवारण करण्याच्या अनुषंगाने वेगाव ग्रामपंचायतीच्या आवारा मध्ये सकाळी 9:00 वाजता पासून तर सुमारे 4:00 वाजे पर्यंत.
कृषी ग्राहक तक्रार निवारण करण्याचे अनुषंगाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर  मेळाव्यात साठ पेक्षा जास्त  शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.


*मेळाव्यामध्ये एकूण 17 शेतकऱ्यांनी * कृषी धोरण 2020″ या* योजनेमध्ये भाग घेऊन एकूण *1,10,000/-  रुपयांचा भरणा केला.* त्याच प्रमाणे वीजबिल विषयी एकूण 8 तक्रारी प्राप्त झाल्या. होत्या प्राप्त तक्रारींचे तीथेच निवारन करन्यात आले.
सदर *कृषी वीजबिल दुरुस्ती शिबिराला वेगाव च्या सरपंच मालाताई रा. गौरकर,उपसरपंच राजु ज्ञानेश्वर कींगरे,व ग्रामसेवक जयंत फुलझेले, महावितरण कंपनीने उपकार्यकारी अभियंता मारेगाव एस. एम.पाटिल, सहाय्यक अभियंता रवींद्र खोंडे, गजेंद्र कुर्लेवार ,सहाय्यक लेखापाल प्रशांत वनकर,जनमित्र अजय नान्ने, आशिष बदखल, रोहित गौरकार हे उपस्थित होते.

लोकप्रतिनिधी सोबतच विविध गावाचे सर्व सन्माननीय वीजग्राहक उपस्थित होते अशी माहिती महावितरण कडून प्राप्त झाली आहे….

Leave a Comment

error: Content is protected !!