ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नरसाळा येथील शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील शेतकऱ्याने नापिकी व जीवनाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून स्वतःचे जीवन संपविले. ही घटणा आज दिनांक 21 डिसेंबर 2022 रोज बुधवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की.
रामदास केशवराव ठाकरे वय सुमारे 58 वर्षे रा.नरसाळा असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून ते काल काही कामासाठी बाहेर गावी जातो म्हणून घरी सांगुन गेले होते.पण रात्री घरी परत आले नाही. आज घरचे काई व्यक्ती कापुस वेचणी करिता सकाळच्या सुमारास शेताकडे गेले होते.

त्यांना ते स्वतःचा शेतात मोनोसिल नावाचे कीटकनाशक प्राशन करून मृत अवस्थे मध्ये शेतात पडून असल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास येताच घटना उघडकीस आली.त्यांनी लगेच घटणेची माहिती मारेगांव पोलीसांना दिली माहिती मिळताच पोलिस घटनस्थळी दाखल झाले.

असून पंचनामा करून त्याला उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.त्यांच्या नावाने नरसाळा येथे सुमारे 5 एकर शेती आहे. यावर्षी पडलेला अती वृष्टी व ओला दुष्काळ आणि मागील काही वर्षांपासून होत असलेली नापिकी यामुळे तो आणि कुटुंबीय कर्जाच्या खाईत लोटलेले होते.

रामदास यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा नातवंड असा अप्तपरिवार आहे. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामदार आनंद अचलवार करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर