ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

कुंभा येथे जनावरांच्या गोठ्याला आग

88 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शेती उपयोगी साहित्य व चारा भस्मसात
सुमारे 4 लाख 40 हजार रुपयाचे नुकसान

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगांव  तालुक्यातील :- कुंभा येथील एका शेतात गोठ्याला आग लागुन गोठा जळून खाक झाला असुन शेती उपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाल्याची घटना दिनांक 2 मे 2022 रोजी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान घडली.यात नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे अंदाजे 4 लाख 40हजार रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

तालुक्यातील कुंभा येथील शेतकरी आशिष बबनराव गोखरे यांचे गट नं.२२/२ /ब १ हेक्टर ८८ आर एवढी शेतजमीन आहे. शेतातच बैलांना बांधण्याचा गोठा सुद्धा आहे. त्याच गोठ्यामध्ये बैलांचा चारा तसेच शेती साहित्य सुद्धा ठेवलेले होते. दिनांक 2 मे 2022रोजी दुपारी 2: 30वाजताच्या दरम्यान गोठ्याला आग लागुन त्यात 30 नग टीन,  5 एकरातील ठिबक सिंचन साठीचे लॅट्रल पाईप, 25 नग लाकडी फाटे, स्प्रिंकलर 30 नग पाईप,  रासायनिक खत 10 बॅग, पशुधनासाठी असलेले वैरण,

प्लास्टिकचे 2 ड्रम, ताडपत्री तीन नग,  शेतीउपयोगी अवजारे, पियुषी अंडरग्राउंड पाईप 25 नग, असे एकूण अंदाजे 4लाख 40हजाराचे साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. एवढ्या मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने या शेतकऱ्याला शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर