ब्रेकिंग न्यूज
Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला मारेगाव बसस्थानकावर खिशावर डल्ला; चौघे पोलिसांच्या ताब्यात ‘पिकांचा खर्चही निघेना’, पोळा कसा साजरा करायचा? शेतकऱ्याच्या डोळ्यात आलं पाणी, Video Crime : सूनबाईच मास्टरमाईंड! एकाच घरात राहून करोडपती सासऱ्याच्या हत्येचा कट, प्लान A,B फेल ठरला तर C मध्ये… मुंबईकर खोळंबा होणार! रात्री अनेक लोकल रद्द, मेल-एक्स्प्रेसलाही फटका, CSMT-कसारा शेवटची लोकल कधी?
SP News Maregaon

निधीअभावी  घरकुलांचे काम ठप्प

66 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पंचायत समिती येथील घरकूल विभागागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी:- गावा गावातील दारिद्र्य रेषेखालील गरजू वंचितांना राहण्यासाठी हक्काचे घरकुल मिळावे म्हणून केंद्र व राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाखो रुपयाचे अनुदान राशी थेट घरकुल लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करते. सध्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनांच्या माध्यमातून निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना टप्या-टप्प्याने अनुदानाची राशी वितरित केली जाते.

झरी जामनी तालुक्यात पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना अनुदान राशीची प्रतीक्षा करावी लागत आहे. सध्यातरी घरकुल बांधकामाला ब्रेक लागल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने पंतप्रधान घरकुल आवास योजना राबविली जात आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील गरजू नागरीकांना राहण्यासाठी हक्काचे घरकुल मिळावे यासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना १ लाख २० हजाराचे अनुदान दिले जाते.

सन २०२१-२२ मध्ये पंतप्रधान घरकूल आवास योजने अंतर्गत ७९९ लोकांना घरकुल मंजूर करण्यात आले होते.व त्यातील 259 नागरिकांचे पहिले हप्ते पंचायत समीती कडून सुपूर्त केले आहे परंतु उर्वरित नागरीकांचे अजून पर्यंत पहिला हप्ता सुधा जमा न झाल्या मुळे घरकुल बांधकाम निर्माणाधीन कार्याला ब्रेकच लागल्याचे चित्र तालुक्यात आहे.

घरकुल मंजूर झालेले लाभार्थी दूरवरुन येऊन पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या पायऱ्या झिजवून निराश होवून घराची वाट धरतात. घरबांधकाम करण्याची योग्य काळ-वेळ असताना पैशाअभावी घरकुलाचे बांधकाम बंद ठेवण्याशिवाय कोणताही पर्यायच लाभार्थ्यांसमोर उरलेला नाही. अनुदान केव्हा जमा होणार याची प्रतीक्षा लाभार्थी करताना दिसत आहे.सन २०२१-२२ मध्ये पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत तालुक्याला ७९९ घरकुलाचा उद्दिष्ठ देण्यात आले होते.

त्यातील  ३४९लाभार्थ्यांच्या अर्जांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. पैकी ३४७ लाभार्थ्यांना आॅनलाईन मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित  लाभार्थ्यांची यादी मंजुरीसाठी जील्हा परिषद यवतमाळ येथे सादर केली आहे.निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी करारनामे केले असून अद्यापही घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ताच मिळाला नसल्याची ओरड आहे. समाजातील इतर मागास प्रवर्गासाठी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत क्रमवार पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जात असल्याने सध्या अत्यंत गरजू व वंचित लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून दुरावत असल्याचे चित्र आहे.

काही  लाभार्थ्यांना 15 हजार प्रमाणे पहिला अनुदानाचा लाभार्थ्यांच्या बँकेच्या बचत खात्यावर पाठविण्यात आले आहे.घरकुल बांधकामाची प्रगती पाहून फक्त ४९ लाभार्थ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता वळात केला आहे. तालुक्यातील घरकुल बांधकामाच्या निर्माणाधीन कार्याची प्रत्यक्ष माहिती घेवून लाभार्थ्यांना बांधकामाविषयी मार्गदर्शन करुन अनुदान राशिचे वेळोवेळी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी तालुक्यात ३ ग्रामीण गृहनिर्माण अभियंते कार्यरत आहे.

या योजनेला गती देण्यासाठी निधीचा बुस्टरडोज आवश्यक आहे.पंतप्रधान घरकूल आवास योजने अंतर्गत रखडलेली अनुसूचित जाती जमाती साठी राखीव असणाऱ्या झरी जामनी विधानसभा क्षेत्रातील सत्तेतील आमदार असलेले प्रशासकीय अनुभव पाठिशी असणारे लोकप्रतिनिधी पंतप्रधान आवास योजणे अंतर्गत घरकुल निर्माणााधिन कार्यात मिळणाऱ्या अनुदानासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार का? असा प्रश्न तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसमोर उभा होत आहे.

निवड झालेले घरकुल लाभार्थी सध्यातरी अनुदानापासून वंचित आहेत. अनुदानाची राशी केन्द्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून वितरित करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.एक जागरुक लोकप्रतिनिधी म्हणून घरकुलाचे अनुदान लाभार्थ्यांना मिळवून देऊन घरकुलाचे कामाला गती दयावी असे जनसामान्या कडून बोलल्या जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर