ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मार्डी येथे संत नगाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी

355 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विविध कार्यक्रमांनी समाज प्रबोधनाची मेजवानी

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:तालुक्यातील मार्डी येथे संत नगाजी महाराज जयंती महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाने गावात अध्यात्मिक आणि समाज प्रबोधनाचा सुगंध दरवळला.

महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी सकाळी घटस्थापनेने झाली. त्यानंतर सिंदी महागाव येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने भजनांचा कार्यक्रम पार पडला. शनिवारी पहाटे ६ वाजता श्रींचा अभिषेक व पोथी पारायण संपन्न झाले. सकाळी १० वाजता संत नगाजी महाराज यांच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून विविध भजन मंडळांनी सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवली.

दुपारी १ वाजता सप्तखंजेरी वादनाची परंपरा पुढे नेत कु. जान्हवीताई सोपान घुमे यांनी जाहीर समाज प्रबोधन कीर्तन सादर केले. त्यांच्या प्रभावी कीर्तनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

या दोन दिवसीय महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नाभिक युवा क्रांती बहुउद्देशीय संस्था आणि समस्त नाभिक समाजातील युवक-युवतींनी पुढाकार घेतला. निरंजन येसेकर, राजू चौधरी, नगाजी वाटकर, मनोज चौधरी, मनिष धाबेकर, गोलू दाभेकर, विकास क्षीरसागर, रमेश दर्वे, गणेश दर्वे, चेतन क्षीरसागर आदी समाज बांधवांनी मोलाचे परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला तालुक्यातील नाभिक बांधव व भगिनींची प्रमुख उपस्थिती लाभली, हे विशेष. महोत्सवामुळे समाजात ऐक्य, भक्ती आणि प्रबोधनाचा संदेश पोहोचल्याचे आयोजन समितीने सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर