ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अन्यायकारक संचमान्यता रद्द करा

1.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शिक्षक संघ 235 शाखा झरीच्या वतीने शिक्षण मंत्र्यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी शालेय शिक्षण विभागाने काढलेला संच मान्यतेचा अन्यायकारक निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा . या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघ र.न. 235 शाखा झरीतर्फे शालेय शिक्षणमंत्र्यांना,तहसीलदार झरी जामणीमार्फत निवेदन पाठवण्यात आले.

२० पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांना सहावी ते आठवीपर्यंतच्या वर्गांना या संचमान्यतेत शुन्य शिक्षक दाखवले आहे. त्यामुळे भविष्यात शाळेत शिकवायला शिक्षकच राहणार नाही, परिणामी सर्व शिक्षण व्यवस्थाच मोडकळीस येईल. मराठी माध्यमांच्या शाळांपुढे तर या संच मान्यतेमुळे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.

तेव्हा हा अन्यायकारक संचमान्यता निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा असे निवेदन प्राथमिक शिक्षक संघ र. नं. 235 तर्फे पाठवण्यात आले.  यावेळेस चित्तरंजन कडू ,गणेश बुट्टे ,विठ्ठल उईके, तुळशीदास आवारी,मारुती मेश्राम,नथुजी गेडाम,गजानन मासटवार, महादेव चाटे, विजय सहारे ,राजेश अक्केवार, संजय डांगे,

जयपाल रघुते,विनोद पोलशेट्टीवार ,विनोद सीडाम , गजानन इरले ,चंदू येडमे ,ताराचंद चव्हाण ,नारायण रोडावार , जयपाल रघुते , विनोद बोरकर, धर्मा मडावी , महादेव डुकरे ,ज्ञानेश्वर इटोळे ,निखिल खपले,नामसनवार, अनिल चेलपेलवार,गवळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर