ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

डोर्ली खूण प्रकारणातील चारही आरोपी गजाआड.

67 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव दिनांक १५ :-डोर्ली येथिल खून प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले होते. त्यास पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. संशयिताकडून सर्व नियोजीत कट आणि त्यातील अन्य तीन संशयितास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.मारेगाव तालुक्यातील डोर्ली येथे ता.९ ला शेतशिवारात येथिल शेतकरी विलास गौरकर वय सुमारे ५० यांचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. खुन झाल्याचे निष्पन्न झाले असता गावातील एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. यात पोलिसांनी संशयिताकडून संपुर्ण घटनाक्रम उघडकीस आणत अन्य तीन संशयितांना ता.१४ ला रात्री अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. डोर्ली येथिल संशयीत विशाल बापुराव झाडे वय सुमारे ३० याचा मृतकाच्या भावाशी जागेबाबत वाद होता तर संशयीत अजित गौबिदास फुलझेले वय सुमारे ३९ राहणार नवरगाव याच्याशी शेतीच्या बांधाचा वाद होता अशातच  संशयित प्रशांत भोजराज काटकर वय३४ संशयीत रुपेश शंकर नैताम वय २९ मारेगाव येथे एका बारमध्ये  संगनमत करून मृतकाचा भाऊ सतिश गौरकर यांच्या बैलजोडीला विषारी इंजेशन देऊन ठार मारून आर्थिक नुकसान करण्याचा बेत आखून ता.८ रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास मृतक शेतकरी विलास गौरकर आणि भावाची शेतजमीन लगत आहे.

मृतकाच्या शेतात भुईमुंग लागवड केली आहे.पिकाचे  रक्षण करण्याकरिता मृतक शेतामध्ये गेले असता गोठ्याजवळ हे चारही संशयीत आढळुन आले.मृतकाने आरडाओरड केली असता दुपट्याने गळा आवळून जीवानिशी चारही संशयिताने ठार केले. चारही संशयितांना ताब्यात घेतले असुन न्यायालयात हजर केले असता ४ दिवसाची  पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संशयितांचा शिताफीने शोध घेण्याचे नियोजन आखून  ठाणेदार राजेश पुरी, उपनिरीक्षक डी.जी सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद जिड्डीवार,नाईक अजय वाभिटकर,राजु टेकाम, रजनीकांत पाटील,सुलभ उईके, नितीन खांदवे, यांनी संशयितांना ताब्यात घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर