ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

मारेगाव तालुक्याचा दहावी निकालात झेंडा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विद्या निकेतनचा १०० टक्के जलवा!


सुरेश पाचभाई | मारेगाव


मारेगाव : माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल काल दिनांक ८ मे २०२६ रोज शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यावर्षी मारेगाव तालुक्याचा एकूण निकाल ८५ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी समाधानकारक यश संपादन केले आहे. तालुक्यातील मुलींनी पुन्हा एकदा उज्ज्वल कामगिरी करत गुणवत्ता यादीत आपला ठसा उमटविला.

तालुक्यातून एकूण १ हजार ८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी ९८७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामधून ८३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता प्रवर्गात ६३, प्रथम श्रेणीत २०२, द्वितीय श्रेणीत ३५४ तर उत्तीर्ण प्रवर्गात २२० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

यावर्षी विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, मारेगाव या शाळेने शंभर टक्के निकालाची नोंद करत तालुक्यात विशेष मान पटकावला. शाळेतील तब्बल २२ विद्यार्थी गुणवत्ता प्रवर्गात उत्तीर्ण झाले. तसेच चिंधुजी पुरके आश्रम शाळेने ९७.०३ टक्के, गिरजाबाई शाळा पिसगावने ९६.१५ टक्के तर शासकीय आश्रम शाळा बोटोनीने ९१.६६ टक्के निकाल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
शाळानिहाय निकाल

जगन्नाथ महाराज विद्यालय, वेगाव – ९१.८१%
राष्ट्रीय विद्यालय, हिवरा मजरा – ७८.२६%
शासकीय आश्रम शाळा, बोटोनी – ९१.६६%
दर्शन भारती विद्यालय, गोंडबुरंडा – ८९.२८%
कै. लक्ष्मीबाई मोघे शाळा, जळका – ५८.३३%
राष्ट्रीय विद्यालय, मारेगाव – ८९.०२%

संकेत शाळा, सराटी – ६०%
जीवन विकास शाळा, हटवांजरी – ७८.७२%
संकेत शाळा, गौराळा – ७३.३३%
विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, मारेगाव – १००%
चिंधुजी पुरके आश्रम शाळा, मारेगाव – ९७.०३%

संत गजानन महाराज विद्यालय, नरसाळा – ७६.१९%
आदर्श हायस्कूल, मारेगाव – ९१.०५%
पंचशील विद्यालय, नवरगाव – ८९.७४%
आदर्श हायस्कूल, मार्डी – ६४.४४%
बालाजी पंत चोपणे विद्यालय, बोटोनी – ९०.९०%
दामोदर पंत कन्या शाळा, मारेगाव – ७३.३३%
भारत विद्या मंदिर, कुंभा – ७८.०२%

महात्मा ज्योतिबा फुले शाळा, मारेगाव – ८७.५०%
कर्मवीर भाऊराव पाटील शाळा, चिंचमंडळ – ७६.६६%
नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा, म्हैसदोडका – ८०.९५%
युगांतर आश्रम शाळा, कान्हाडगाव – ८६.९५%
गिरजाबाई शाळा, पिसगाव – ९६.१५%

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर