Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

अखेर अडेगाव-खडकी रस्ता

तीन कोटी  बत्तीस लाख रुपयाला प्रशासिय मान्यता

मंगेश पाचभाई व समस्त गावकरी यांच्या खड्यात उपोषणाला यश

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- अडेगाव -खडकी-गणेशपुर परिसर गौण खनिजे  व्यापलेले आहे  वाहून नेण्या करिता  चालणारी वाहतूक अडेगाव-खडकी मार्गे तेलंगाणा राज्याला जोडते हा रस्ता ओव्हरलोड वाहतूकीमुडे  रस्ता मागील अनेक दिवसांपासून पूर्णतः खरांब झाला होता त्यात युवा नेते मंगेश पाचभाई व गावकरी यांनी अनोखे खड्यात बसून उपोषण केले होते त्या उपोषणाचे संपूर्ण जिल्ह्यात लक्ष लागले होते हाच मुद्दा युवा नेते मंगेश पाचभाई वारंवार प्रशासनाकडे लाहून धरत होते या रस्ता संदर्भात प्रशासनाणे आता मंजुरात देऊन निधी उपलब्ध करून दिला आहे.


यवतमाळ जिल्ह्यातील  टोकावरील झरी-जामनी तालुक्यातील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव –  खडकी – गणेशपुर या परिसरात मोठ्या खदानी आहे . या खदानीच्या मोठ्या वाहतूकी ही खडकी मार्गे अडेगाव या रस्त्याणी चालत असतात . या परिसरात जगती मिनरल्स , ईशान मिनरल्स , सूर्या मिनरल्स , गुंडावार मिनरल्स , मोनेट इसपात व  इतर गिट्टी खदानीचे मोठी वाहतूक ही अडेगाव रस्त्याणी जाते , मात्र या रस्त्याची मर्यादा फक्त  “दहा टनची” असताना या रस्त्यावरून खदानी चे मोठी जड वाहतूक होते . यामुळे अडेगाव – खडकी रस्ता संपूर्ण खराब झाला असून प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा प्रशासन या मागणी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते.

या परिसरातील जड वाहतूकीमुळे  संपूर्ण कंपनीने रस्ता पूर्णतः खराब झाला होता.तरी अनेकवेळा रस्त्याची मागण्या करून सुद्धा रस्ता न झाल्याने अडेगाव येथील युवा नेतृव मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखाली पासून खडकी बस स्थानकाच्या बाजूला अनोखे खड्यात उपोषण केले व प्रशासनाला जागे केले मंगेश पाचभाई व सरपंच सीमा लालसरे यांनी
वारंवार पत्र व्यवहार करून पालकीमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे मागणी लाहून धरली व अखेर 3 कोटी 32 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून कामाला सुद्धा लवकरच सुरवात होण्याचा अंदाज आहे .

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!