ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मांगली मुकुटबन मार्गावर भरधाव ट्रॅक्टरचा अपघात.एक ठार तर दोघे गंभीर जखमी.

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी झरी (जामणी) मुकुटबन मांगली मार्गावर तीन वाजताच्या सुमारास मांगली नजीक ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की.
मुकुटबन वरून मातीने भरलेला ट्रॅक्टर मांगली कडे निघाला होता.मांगलीच्या अलिकडचे वळण पार केल्यानंतर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर डावीकडे मार्गाच्या खाली उतरले आणि पलटी झाले.यात दुर्गेश दडांचे वय सुमारे 22 रा.खापरी या युवकाचा ट्रॅक्टरच्या ट्राली खाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला.

असून अभिषेक लाकडे वय 23 रा मुकुटबन आणि चेतन लाकडे वय 21 रा मुकुटबन हे दोघेही गंभीर जखमी झाले असून जखमीना खाजगी वाहनाने मुकुटबन येथे रुग्णालयात प्रथमतःदाखल केले व पुढील उपचारार्थ वणी आणि नंतर यवतमाळला रेफर करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच मुकुटबन पोलिसांनी घटनस्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

मृतकांच्या नातेवाईकांकडून ट्रॅक्टर मालकाकडून मृतकाच्या आई वडिलांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी केली होती.या विषयी जोपर्यंत ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत मृतकाचे शवविच्छेदन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला होता.या संदर्भात बराच वेळ घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. अधिक तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर