ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

बुरांडा ते खापरी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य.

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- बुरांडा ते खापरी रस्त्याच्या कामाला पंधरा वर्षानंतर सुरुवात झाली आणि 2.5 की.मी पैकी फक्त 2 कि.मी चे डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने उर्वरीत अर्धा कि.मी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

खापरी येथे जाण्याकरिता एकमेव मार्ग असुन पाऊसा मुळे ह्या रस्तावर चिखल व साचलेल्या पाण्यामुळे अखेरची घटका मोजत आहे. रस्त्याची अवस्था एवढी बिकट आहे. की वाहन तर दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असुन खापरी ते बुरांडा हा रस्ता पंधरा वर्षांनंतर तयार झाला आहेत. पण तो ही केवळ 2.5 पैकी 2 कि.मी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे.

हे काम गेल्या मे 2022 या महिन्यात करण्यात आले आहे पण उर्वरीत अर्धा कि.मी रस्ता पूर्णताहा उखडून खड्डे व चिखलमय झालेला आहे. तालुक्यामध्ये सध्या सततच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.या रस्त्याने चिखलातून व पाण्यातुन पायदळ चालने सुद्धा कठीण झाले आहे.उर्वरीत अर्धा कि.मी हा रस्ता जिल्हा परीषद अंतर्गत येत असुन सबंधित अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी विचारणा केली असता तुमचा रोड जिल्हा परीषद मधुन मंजुरी करिता पाठवला आहे.आणि सरकार बदल्यामुळे तो रद्ध करण्यात आला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया.
गेल्या पंधरा वर्षापासून खापरी रस्ता दुर्लक्षित होता पण गेल्या मे 2022 या महिन्यात 2.5 की.मी. पैकी 2 की.मी. रस्त्याचे डांबीकरणाचे काम जिल्हा परिषद मार्फत करण्यात आले आहे. पण उर्वरित अर्धा कि.मी या रस्त्याने पावसाळ्यात पायदळ चालणे सुद्धा कठीण बाब झाली आहे.उखळलेल्या रस्त्यातून चिखल व साचलेल्या पाण्याचा तून दुचाकी तर सोडा पण साधे पायदळ चालणे कठीण झाले आहे. एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास येथुन तालुक्याच्या ठिकाणी त्याला नेण्यास मोठी कसरत करावी लागत आहे.आणि बाहेरगावी शाळेत ये- जा करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर बाबीची त्वरीत दखल घेण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर