ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

विहिरीत आढळला शेतकरी पुत्राचा मृतदेह

2.5k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गोंडबुरांडा येथील येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

गावा पासून काही अंतरावर असलेल्या शेतात बैल चारण्यासाठी गेलेल्या एका शेतकरी पुत्राचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्याती गोंडबुरांडा येथे घडली.अमोल भदुजी पारखी वय 42 वर्ष रा.गोंडबुरांडा असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या शेतकरी पुत्राचे नाव असून

अमोल यांच्या वडिलांच्या नावाने 3 एकर शेती असल्याची माहिती आहे. अमोल हा काल दिनांक 26 डिसेंबर 2024 रोज गुरुवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्याने ठेक्याने केलेल्या शेतात बैल घेवुन गेला होता.सायंकाळी 6 वाजच्या सुमारास बैल हे स्वताच घरी परत आले परंतु अमोल हा बैलांन सोबत घरी परत आला नाही.

त्या मुळे कुटुंबातील काही सदस्यांनी त्यानी ठेक्यांने केलेल्या शेताकडे जावुन पाहीले असता तो कुठेही दिसुन आला नाही.त्यांनी परिसरात सगळीकडे शोधाशोध घेतला परंतु त्याचा थांग पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी शेतातील विहीरीकडे जावुन पाहीले असता अमोल भदुजी पारखी यांची चपला विहीरीतील पाण्यावर तरंगतांना दिसल्या मुळे नातेवाईकांनी गावातील लोकांच्या मदतीने लोखंडी गरच्या साह्याने विहीरीच्या पाण्यात शोध घेतला असता अमोल भदुजी पारखी हा मृत अवस्थेत दिसुन आला.

सदर घटना काल दिनांक 26 डिसेंबर 2024 रोज गुरुवारला रात्री 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या नातेवाईकांनी लगेच मारेगाव पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते.

मृतक अमोल यांचे पश्चात आई,वडील,पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. वृत्त लिहिपर्यंत मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गर्शनाखाली जमादार दिगांबर कीनाके करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर