ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी महिला धडकल्या पोलीस ठाण्यात

913 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सिंधी येथील महिलांचे पोलीस उपनिरीक्षकांना निवेदन

प्रमोद रा. मेश्राम मारेगाव

गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी आणि या अवैध दारूपासून सिंधी येथील नागरिकांची सुटका करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन घेऊन सिंधी येथील महिला पोलीस ठाण्यात धडकल्या. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विकी जाधव यांना अवैध दारू विक्री बंदी बाबतचे निवेदन सादर केले.

तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात ऊत आलेला आहे. तालुक्यातील अनेक गावात ही दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.पोलीस विभागाचे या अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष दिसत असल्याने ही दारू विक्री तालुक्यात पुन्हा फोफावत असल्याची चर्चा नागरिकांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे.

सिंधी येथील अंकुश महादेव वैद्य हा सिंधी पहापळ रस्त्यादरम्यान अवैधपणे दारूची खुलेआम विक्री करीत होता.दिनांक 8 फेब्रुवारीला महिलांनी त्याला दारू विकताना रंगेहात पकडले.त्याला दारू विक्रीसाठी मज्जाव केला असता उलट त्याने महिलांशी हुज्जत घालत त्यांच्याशी वाद घातला.सिंधी या गावामध्ये भक्तीमय वातावरण मोठ्या प्रमाणात असते.

वर्षातून अनेक धार्मिक कार्यक्रम येथे होत असतात. या गावातील भजनी मंडळ सुद्धा प्रसिद्ध असून अशा या भक्तीमय वातावरणाला  अवैध दारू विक्री मलीन करीत असते. महिलांनी या अंकुश वैद्य ला दारू विकण्यास मज्जाव केला असता त्याने गावकरी माझे काहीच करू शकत नाही, पोलीस वाल्यांना मी भीत नाही, तुमच्याकडून जे होते करा अशा प्रकारची दमदाटी महिलांना केली. अखेर महिलांनी दिनांक 9 फेब्रुवारीला पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार पोलीस उपनिरीक्षक विकी जाधव यांना दिली.

यावेळी सरपंच नीलिमा चंद्रशेखर थेरे, संतोष भाऊराव निब्रड, पोलीस पाटील, पुरुषोत्तम नानाजी भोयर, दिनेश झित्रूजी गेडाम, सोनू श्यामसुंदर ढवस, प्रियंका संदीप देवाळकर, सविता विलास नेहारे,छाया संतोष निब्रड, कुसुम डाखरे, सुरेखा म्हसे, संगीता महारतळे, कोमल डाहुले, विजया गोहोकर, प्रियंका देवाळकर, शशिकला लेडांगे, इंदुबाई लेडांगे, सोनाबाई भगत, रेखा महारतळे, लता जांभुळकर,अंजनाताई पोतराजे, सुरेखा गायकवाड, पल्लवी परचाके, मंजुषा जांभुळकर, सुनीता परचाके यांच्यासहित अनेक महिला पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होत्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर