Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

दुचाकीने रस्त्याने चालत असताना कुत्रा आडवा आल्याने 2 गंभीर जखमी.

राज्य महामार्गावरील मारेगाव येथील तहसील कार्यालय जवळ भिषण अपघात.

मारेगाव येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव येथील वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर मारेगाव येथील तहसील कार्यालय जवळ आज दिनांक 24ऑगस्ट 2022 रोज बुधवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास दुचाकीला कुत्रा आडवा आल्याने दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहे.

मारेगाव तहसील कार्यालय जवळ हा अपघात झाला असुन. विशाल विलास महारतळे वय सुमारे [25] वर्षे रा.सिंधी [महागाव] ता.मारेगाव जी.यवतमाळ व झित्रु संभा गाडगे रा. बुरांडा (ख) वय सुमारे (70) वर्ष असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते आज दुचाकीने मारेगाव येथुन काम आटपून परत बुरांडा (ख) येथे स्वगावाला वापस येत असताना तहसील कार्यालय जवळ कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले .

असुन त्यांना काही लोकांनी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले येथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रा कडून प्राप्त झाली आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!