ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

ओबीसी मुला – मुलींसाठी ७२ वसतिगृहे तात्काळ सुरू करा.

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ओबीसी जातीनिहाय जनगणना कृती समिती मागणी.

मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,व बहुजन विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार, तहसील कार्यालय झरी मार्फत दिले निवेदन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी:- संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना महाराष्ट्रातील ओबिसी,एसबिसी,व्हिजेयेन्टी विद्यार्थी मात्र उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ३६ जिल्ह्यातील ७२ वसतिगृहे तात्काळ सुरू करा अशा मागणीचे निवेदन आज दिनांक ३ सप्टेंबर २०२२ रोजी झरी तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की विदर्भातील सर्व सामाजिक ओबिसी,विजेएनटी,एसबीसी, संघटनांच्या माध्यमातून ७ ऑगस्ट रोजी मंडल यात्रा काढण्यात आली,ही यात्रा नागपूर येथून निघून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ,वर्धा,असे मार्गक्रमण करीत नागपूर येथे समाप्त झाली.यात्रे दरम्यान १५ हजारांचे वर सामान्य ओबिसी जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये ३६ ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे व इतर महत्त्वाच्या मागण्या साठी विचारना केली गेली.

त्यात ग्रामीण भागात शिक्षणाच्या व रोजगाराची सोय उपलब्ध नसल्यामुळे ओबीसी च्या न्याय मागण्या पूर्ण व्हाव्यात हि मागणी सर्वसामान्य ओबीसीची होती, आपल्या सरकारने ओबीसी चे हक्क व अधिकार द्यावे अशी मागणी केली आहे.महाराष्ट्रातील ओबीसी,विजेएनटी,एसबीसी समुदायातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण प्राप्त करण्यास अनेक अडचणी येतात उच्चशिक्षण घेण्याकरिता विद्यार्थ्यांना शहरात जावे लागते,त्यांना शहरातील खर्च परवडणारा नाही.त्यामुळे वसतीगृहे तात्काळ सुरू करावी, मागील महायुतीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या ३० जानेवारी२०१० रोजी शासन आदेशानुसार ओबीसी,विजेएनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ वसतीगृहा साठी माण्यता मीळाली होती,

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात बहुजन कल्याण मंत्र्यांनी अनेकदा घोषणा केल्या की प्रत्येक जिल्ह्यात मुलामुलींसाठी दोन स्वातंत्र असे ७२ वसतिगृहे होतील परंतु आज चार वर्षे पूर्ण झाली असून वसतीगृहे सुरू झाली नाही.तरी आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा नाईलाजास्तव आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते असा इशारा निवेदनातु देण्यात आला.यावेळी जनगणना कृती समितीचे समनव्यक आशिष साबरे,गणेश बुट्टे, संजय चामाटे, राजू गुरनुले,यासह वणी,झरी,मारेगाव येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर