ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शेतजमीन मोजणीला अडथळा केल्याने मायलेकास दंडाची शिक्षा.

90 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

शेतजमीन मोजणीला अडथळा केल्याप्रकरणी आरोपी नामे गंगन्ना आशन्ना ड्यागर्लावार व नरसाबाई आशन्ना ड्यागर्लावार दोन्ही रा.पाटण ता.झरीजामणी जि.यवतमाळ यांना प्रत्येकी बाराशे रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री बी.एस.वाढई यांनी दी. २४/०५/२०२३ रोजी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे.
की दिवाणी न्यायालय झरी येथील एका दिवाणी दाव्यातील दोन्ही पक्षकारांचे शेतजमीनीची संयुक्त मोजणी करीता कोर्ट कमीश्नर म्हणून न्यायालयाने तालुका भुमी अभिलेख कार्यालयातील भुमापक रवि सोयाम यांची नियुक्ती केली होती त्यावरून भुमापकाने दि.१५.०९.२०२१ रोजी शेतजमीन मोजणी करीता मोक्यावर गेले होते.

सोबत पोलीस कर्मचारी सुद्धा होते त्यावेळी लगतचे शेतकरी आरोपी यांनी त्यांचे गटात भुमापकास झेंड्या गाडु दिले नाही व झेंड्या लावल्यास आम्ही आत्महत्या करतो अशी धमकी देत मोजणीला अडथळा केला वरुन भुमापकाने न्यायालयात अहवाल दाखल केला त्यावरुन न्यायालयाने आरोपी विरूद्ध भादवीचे कलम १८६,१८७,१८८,१८९,५०६,३४अंतर्गत दोषारोप निश्चित केले.

प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने भुमापक व पोलीसाचे पुरावे नोंदविण्यात आले साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी मायलेकास वरील प्रमाणे शिक्षा सुनावली यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील श्री पी डी कपुर व पैरवी अधिकारी म्हणून जमादार मारोती टोंगे व नापोका संतोष मडावी यांनी काम पाहीले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर