ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायतचा निकाल जाहीर.

116 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

काही ठिकाणी पहावयास मिळाल्या चूरशीच्या लढती.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील निवडणुकांचा निकाल आज दिनांक 19 सप्टेंबरला 2022 रोज सोमवारला जाहीर झाला. यात काही गावांमध्ये जुन्यांच्या विरोधात मोठा उलटफेर पहावयास मिळाला. तर काही ग्रामपंचायतमध्ये जुन्यांनीच पुन्हा बाजी मारल्याचे चित्र आहे.मारेगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायतच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.

या निवडणुकांची मतमोजणी आज मारेगांव येथील तहसील कार्यालयात पार पडली. या सर्व 11 ही ग्रामपंचायती पेसा अंतर्गत असल्याने येथे मोठी चूरस पहावयाला मिळाली. या निवडणुकीत सरपंच पदाची माळ गळ्यात पडलेल्या उमेदवारांची नावे गावनिहाय खालीप्रमाने:-

यातील कान्हाळगाव – केगांव गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संजय श्रावण येरमे 320 मते घेऊन निवडून आले. मच्छिन्द्रा – बामर्डा गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी प्रशांत सुरेश सोयाम 130 मते घेऊन विजयी झाले. वरुड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निर्मल शंकर बोन्दरे 307 मते घेऊन विजयी झाले.डोल -लाखापूर गट ग्रामपंचायत निवडणुकीत शीतल संजय येरमे 409 मते घेऊन विजयी झाल्या. जळका ग्रामपंचायतच्या निवडणुकीत ज्योत्स्ना सुनील कुमरे 206 मते घेऊन विजयी झाल्या.

खंडणी – मेंढणी गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी दयानंद कवडू कुळमेथे हे 521 मते घेऊन विजयी झाले. वागदरा गट ग्रामपंचायतच्या सरपंचपदी दादाराव पंजाब ढोबळे हे 399 मतदान घेऊन निवडून आले. सराटी गट ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून तुळशीराम भीमराव कुमरे हे 450 मते घेऊन निवडून आले. गोधणी गट ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून मंदा पांडुरंग मंडाळी ह्या 241 मते घेऊन निवडून आल्या. अर्जुनी -रायपूर या गट ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून वंदना पुरुषोत्तम आत्राम ह्या 183 मतदाणांनी निवडून आल्या.

तर सगणापूर गट ग्रामपंचायतचे सरपंचपदी दादाराव कपलू टेकाम हे 588 मतदान घेऊन निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.के. जाधव,सुधाकर जाधव,आणि संजय वानखेडे यांनी काम पहिले.तर निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक पुंडे यांनी काम पहिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर