ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

जिवंतपणी तर नाही सोय !! मेल्यावरही का गैरसोय .

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

स्म्शानभूमिला शेड नसल्याने अंत्यविधीची गैरसोय
पावसात ताळपत्रीचा वापर.

दापोरा गावाची विदारक परिस्थिती.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[992286218]

मारेगाव :- जन्मा पासून ते मरना पर्यंत शासनाच्या विविध योजना अस्तित्वात आहे.मात्र यंत्रनेच्या नियोजन शून्य कार्यप्रणालीमुळे नागरिकांना लाभा पासून वंचीत राहावे लागत आहे. मानवाच्या विकासा करिता शासन स्तरावरून विविध योजना राबविल्या जात असताना खैरगांव(बुट्टी)ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असलेल्या दापोरा या छोट्याशा गावात अजूनही अंत्यविधीसाठी शेडची व्यवस्था करण्यात आली नसल्याने भरपावसात मृतदेहाला अग्नी देताना ताळपत्रीचा वापर करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसा पासून सततधार पावसाचा कहर सुरु आहे. जन्म आणि मृत्यू दोन्ही घटना नैसर्गिक असल्यामुळे कधीही घडत अशातच मारेगाव तालुक्यातील खैरगांव ग्रामपंचायत च्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या दापोरा या गावात सुभाष जवादे या वृद्धाचा दिनांक 23जुलै ला मृत्यू झाला. सततधार पाऊस  थांबण्याची शक्यता नसल्याने नातेवाईकांना पावसात अत्यविधी पार पडावा लागला आहे.

मात्र या गावात स्म्शानभूमीला शेड नसल्यामुळे अत्यविधीला मोठी अडचनीचा सामना करावा लागला आहे. अजूनही काही गावात शेड ची व्यवस्था नसल्याने मृतदेह अर्धवट जळून विटंबणा होत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. मात्र 23तारखेला दापोरा येथील मृतक जवादे याचा पार्थिवास अग्नी देताना चित्ता पावसाने विझू नये यासाठी त्याच्या सरणावर त्याच्या नातेवाईकांनी टाळपत्रिचा तंभु उभारून चिंताग्नी दिला.

शेड अभावी चिता जळणार कशी? असा प्रश्न उभा असताना त्यांनी प्रसंगावधान ओळखून अंत्यविधी पार पडला आहे. त्यामुळे गावा गावात स्म्शानभूमीच्या सौन्दरयीकरणासाठी शासन लाखो रुपयाचा निधी खर्च करीत असताना आमच्या गावाला योजनेचा लाभ का नाही असा संताप जनक प्रश्न दापोरावासी उपस्थित ग्रामस्थ करीत आहे.

दापोरा हे छोटे गाव असल्यामुळे लोकप्रतिनिधीचे या गावाकडे फारसे लक्ष नाही.स्मशानभूमीची मागणी गेल्या अनेक दिवसापासूनची असताना राजकारणाच्या चक्रव्हूवात यापूर्वी च्या कार्यकाळात दुर्लक्ष झाले. आता मात्र स्मशानभूमीला प्राधान्य क्रम असून लवकरच स्मशानभूमी उभारण्यात येईल असे खैरगाव दापोरा गटग्रामपंचायत चे सरपंच रामचंद्र जवादे यांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर