ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाना सात्वन पर भेट.

113 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा काल मारेगाव तालुक्यात दौरा.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील :- एकदा पूर आला शेतकऱ्याचे नुकसान झाले, शेतकऱ्यांनी पुन्हा पीक उभे करण्याचा प्रयत्न केला पुन्हा नुकसान झालं,पहिल्याच पुराच्या वेळी जर सरकारनी तात्काळ काही आर्थिक मदत पोहविली असती तर कित्येक आत्महत्या थांबल्या असत्या पण या सरकारला भावनाचं नाही आहे. हे सरकार सत्तेच्या सारिपाटात गुंतलेलं आहे.

त्यामुळे या सरकारच्या मंत्र्यावर 302 गुन्हे दाखल झाले पाहिजे.अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी माध्यमानी घेतलेल्या विशेष मुलाखती दरम्यान दिली. ते मारेगाव तालुक्यातील बोरीं (गदाजी) दांडगाव येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाना सात्वन पर भेटी दरम्यान बोलत होते.

त्याचे सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार तथा जिल्हा सपंर्क प्रमुख बाळासाहेब मुंनगिनवार मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी, माजी जी. पं. सदस्य सुनील गेडाम, प्रामुख्याने उपस्थित होते.ते पुढे बोलताना म्हणाले की, आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी काही अडचणी आल्यास तातडीने मार्गी लावू,कुटुंबियांनी खचून न जाता हिंमतीने लढले पाहिजे, आम्ही आपल्या सदैव पाठीशी आहे.

त्यानंतर त्यानी वानोजा (देवी)येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून दांडगाव येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी तोताराम चिंचोलकर यांच्या कुटुंबाची सात्वन पर भेट घेतली. त्यानंतर त्याचा ताफा वणी येथील होटल जन्नत मध्ये विश्रांती साठी रवाना झाला.

सरपंच अरविंद ठाकरे यांनी केली 25 हजार रुपयाची मदत
बोरीं (गदाजी) येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी पुंडलिक रुयारकर यांच्या कुटुंबाला कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांनी 25 हजार रुपयांची रोख रक्कम विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते प्रदान करून आणखी काही अडचणी असल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले ही आत्महत्या ग्रस्त कुटुंबाला पहिलीच मदत आहे. यापूर्वी अनेक सरकारी निमसरकारी पदाधिकाऱ्यानी भेट दिली मात्र प्रत्यक्षात आता पर्यंत कोणालाच मदत पोहचली नाही. मात्र कुंभा येथील सरपंच अरविंद ठाकरे यांनी या कुटूंबाची परिस्थिती पाहुण 25 हजार रुपये रोख रक्कम दौऱ्यावर असलेले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते प्रदान केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर