ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मार्डीत रंगणार 31 मार्चला महिला समूह नृत्य स्पर्धा.

140 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ मारेगाव यांचा संयुक्त उपक्रम.

गजनान आसुटकर मारेगाव:-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला शक्तीचा जागर करून त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव मिळन्यास व्यासपीठ उपलब्ध होऊन महिलांना आपली कला सादर करता यावी या अनुषंगाने पुढाकार घेत जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या सौजन्याने ‘जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांकरिता भव्य समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन दिनांक 31मार्च’ रोजी मार्डी येथील जि.प.शाळेच्या प्रांगणात सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे.

महीलांचे सबलीकरण व सशक्तीकरण ही काळाची गरज असुन महिलातील सूक्ष्म कलागुणांना वाव मिळण्यास योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे या अनुषंगाने एक पाऊल पुढे जात जनहित कल्याण महिला संघटना आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “भव्य महिला समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन” 31 मार्च 2023 रोजी मार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे.

या भव्य महीला समुह नृत्य स्पर्धेचे उद्घाटन सुवर्णा खामनकर यांच्या हस्ते पार पडणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जनहित कल्याण महिला संघटनेच्या अध्यक्षा कविता मडावी भुषवीणार आहे.या भव्य समुह नृत्य स्पर्धेस महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजक ‘जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ,मारेगाव यांचे वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर