ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मच्छिन्द्रा येथे क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी.

127 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे जननायक विर बिरसा मुंडा जयंतीचे आयोजन येथील क्रांतिसुर्य बिरसा मुंडा युवा सेना समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमांची सुरवात मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 ला “सामान्य ज्ञान स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती, यात 33 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून प्रथम क्रमांक अंजली आत्राम, द्वितीय अथर्व आत्राम तर तृतीय क्रमांक सौरभ मिलमीले यांनी पटकावला.

त्यानंतर सायंकाळी येथील समाज बांधव एकत्र येऊन मिरवणूक काढण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्री. रजनिकांत पाटील (बि.ज.पोस्टे. मारेगाव), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.गित घोष साहेब (आदिवासी विचारमंच, साहित्यिक, लेखक,तथा राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा. स. ह. परिषद), प्रमुख मार्गदर्शक कैलास मेश्राम (सामाजिक कार्यकर्ता),कु.ऋतुजा कुळसंगे, येथील सरपंच मा. प्रशांत सोयाम, पोलीस पाटील डॉ प्रशांत पाटील, मार्डी, माजी सरपंच श्रीधर पेंदोर,हे मंचावर होते. कार्यक्रमाचे सर्व मान्यवरांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रुती मेश्राम तर आभार प्रदर्शन शुभम मेश्राम यांनी केले.

कार्यक्रमांची सुरवात दिप प्रज्वलीत करून व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात झाली. मार्गदर्शक यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती देवून आदिवासी समाजाने संघटित होऊन समाज कार्य कसे करावेत यावर मोलाचे मार्गदर्शन केलेत. अध्यक्षीय भाषणात गितघोष यांनी आदिवासी समाजाच्या इतिहासावर मोलाचे मार्गदर्शन केलेत. आयोजित क्रांतिसुर्य बिरसा मुंडा युवा सेना समितीच्या सर्व समाज बांधवाचे आभार मानून कार्यक्रमांची सांगता झाली. या कार्यक्रमाला युवा समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर