ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

अमृत आहार व पोषण आहार योजनानेत अपहार .

80 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप.

संभाजी राऊत यांची महिला बाल विकास कल्याण मंत्री यांचे कडे तक्रार.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- लहान मुलांसाठी सुरू केलेल्‍या अंगणवाडीतून प्राथमिक ज्ञान व पोषण आहार पुरविला जातो. परंतु, माथार्जून येथील अंगणवाडी क्र.एक व अंगणवाडी क्र. दोन येथील अंगणवाडी शिक्षिका त्यांच्या मनाप्रमाणे भरवून मुलांना दिल्‍या जात असलेल्‍या पोषण आहारावर डल्‍ला मारत असल्‍याचा आरोप माथार्जून येथील पालक संभाजी राऊत यांनी केला आहे.

सविस्तर वृत्त असे की.
माथार्जुन येथे अंगडावणी भाग 1 आणि भाग. 2 एकुण दोन अंगणवाडी सेवीका कार्यरत असुन सन 2020 ते 2022 या चालू सत्रात माहीती अधिकार अधिनियम 2005 (3) नुसार माहीती मागीतली असता माहीती देण्यास नकार दिला तेव्हा प्रथम अपिलीय अधिकारी यांचे मार्फत अर्ज दाखल केला असता माहीती मिळाली नाही.

त्यानंतर प्रथम अपिलीय अधिकारी यांचेकडे अपिल दाखल करण्यात आली त्या मध्ये.सुनावणी अंती दिशाभुल करणारी चुकीची अपुर्ण माहीती देन्यात आली. शासन स्तरावरील मंजुर आला. बिलाच्या निधी संदर्भात कसलेही माहीती दिलेली नाही.आणि सुनावणी नंतर मला 15 दिवसात आदेश देतो व उर्वरीत माहीती पुर्ण देतो असे तोंडी प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी यांनी सांगीतले पण माहीती मिळाली नाही.

उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली व अपुरी माहीती देण्यात आली.देण्यात आलेल्या अपुऱ्या माहीतीतूनच उघड झाले की शासनाकडुन लहान मुले मुली (बालकांना), गरोदर मातांना येणारा पोषण आहार अमृत आहार नियमित वाटप करीत नसुन स्वता दोन्ही अंगणवाडी सेवीका अपहार करीत आहे. या प्रकरणात वरीष्ठ कर्मचारी तथा 22 अधिकारी यांचे साटेलोटे नाकारता येत नाही.

माथार्जुन गाव आदिवासी बहुल असुन शासनाच्या योजनाद्वारे लहान मुले मुली गरोदर माता यांना जिवनसत्वं, अन्नघटक योग्य प्रमाणात मिळावे म्हणुन अंगणवाडीच्या माध्यमातुन पोहचविण्याचे कार्य असते. बालक कुपोषीत होऊ नये आणि कुपोषीताचे प्रमाण वाढु नये म्हणुन त्यांना पोषण आहार व अमृत आहार दिल्या जातो.

पण अंगणवाडी सेवीका स्वताच अपहार करीत आहेत. फक्त आणी फक्त कागदोपत्रीच वाटप दाखवित असुन | रेकार्ड सुध्दा सविस्तर नियमित दिसुन येत नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व झरी येथील महिला बाल कल्याण विकास प्रकल्प कार्यालय झरी यथिल अधिकारी यांचे सुध्दा सदर प्रकरणात पाणी मुरत असल्याचे दिसुन येते.

चौकशीचे वेळेस तक्रारकर्ता बालके, महिला गरोदर माता पालक वर्ग यांचे समल जिल्हा स्तरीय पथक यवतमाळ यांनी येऊन चौकशी करावी अहवाल (अभिप्राय) विनाविलंब देण्यात यावा त्या माहीतीतून काय-काय चुका आणि किती चुका झालेल्या आहेत त्या स्पष्ट होतील व जील्हा स्तरीय विभागाने तात्काळ या प्रकरणातील अहवाल मागावा.

कोणत्या प्रमाणात प्रती लाभार्थी यांना वाटप आहे. लाभार्थी संख्या मुले मुली गरोदर माता कीती या प्रकरणातील गर्भिय लक्षात घेता चौकशीचे आदेश देण्यात यावे व शासनाचा लहान मुले, मुली, गरोदर माता यांना मिळणारा पोषण आहाराची लूट थांबवावी आणि बालकांना व गरोदर मातांना न्याय मिळवून दयावा अशी तक्रार महीला बाल विकास कल्याण मंत्री, महीला व बाल कल्याण विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हा अधिकारी यवतमाळ, महीला व बाल कल्याण विभाग (जी, प) यवतमाळ यांच्याकडे संभाजी राऊत यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर