Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

किराणा दुकान बनले मेडिकल स्टोअर्स.

बेकायदेशीर औषधची विक्री, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील पूर्वी ताप ,सर्दी , खोकला ‘ डोकेदुखी,अपचन,हगवण उलटी या सारख्या लहान मोठ्या आजारांवर घरगुती आयुर्वेदिकउपचार केला जात.परंतु आता काळ बदलला ‘आजीचा बटवा ‘ कालबाह्य झाला आहे.

तात्काळ आराम वाटावा यासाठी आता मेडिकल मधील गोळ्या औषधी सेवन करण्याकडे सगळ्यांचा कल असतो.तसे पाहता तालुक्यात झरी,पाटण,मुकूटबन अडेगांव ही गावे वगळता मेडीकल स्टोअर्स नाहीत याचा फायदा घेत ग्रामीण भागात काही पानटपऱ्यांसह किराणा दुकानात सुद्धा औषधी गोळ्यांची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांच्या रुग्णांची संख्या वाढल्याने सरकारी व खासगी रुग्णालयात गर्दी दिसत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नावालाच उरले असून तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी आहे.या परिस्थितीचा फायदा घेत ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. कुठलीच वैद्यकीय पदवी नसलेल्या डॉक्टरांनी व्यवसाय जोरात चालविला आहे.

हे कमी होते म्हणून,ग्रामीण भागात किराणा दुकान व पानटपरीमध्ये सुद्धा विविध आजारांवरील औषधांची विक्री सुरू झाली आहे.कोणतेही वैद्यकीय ज्ञान व परवाना नसताना हे दुकानदार ताप,सर्दी,हातपाय दुखणे,हागवण,थंडी वाजून ताप येणे,डोके दुखणे आदी आजारांवरील औषधी उपचारासाठी गोळ्या देतात.शिवाय या दुकानातून मुदत संपलेल्या औषधांची विक्री होण्याचा धोका आहे.

आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने या घटनांना प्रतिबंध घालण्याची गरज आहे.ज्या मेडिकल स्टोअरमधून औषधी गोळ्यांचा साठा विकण्यासाठी दिला जातो,त्यांच्यावर सुद्धा कारवाईची गरज आहे.

प्रतिक्रिया..
रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. शिवाय औषध शासनमान्य मेडिकल स्टोअर्समधूनच घ्यावे. औषधे विकणाऱ्या पानटपरी व किराणा दुकानदारांवर नियमानुसार तात्काळ कारवाई करण्यात येईल.
-मोहन गेडाम
(तालुका आरोग्य अधिकारी)

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!