ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

प्रशासनाला अखेर खडबडून आली जाग

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कच्या बातमीचा मोठा इफेक्ट

करणवाडी–खैरी रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील करणवाडी–कुंभा ते खैरी या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कने “करणवाडी–खैरी रस्ता मोजतोय अखेरची घटका” ही बातमी प्रसिद्ध केल्यानंतर अखेर प्रशासन हालचालीत आले असून, संबंधित रस्त्याच्या दुरुस्ती व खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले होते. मात्र अवघ्या काही दिवसातच कुंभा व महादापेठ गावांदरम्यान असलेल्या पुलावर दीड ते साडेतीन फूट खोल खड्डे पडल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली होती. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह एसटी बसची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अपघाताचा  गंभीर धोका बनला होता.

https://spnewsmaregaon.com/?p=39814

हा रस्ता शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, व्यापारी तसेच प्रवाशांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र रस्त्यावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, मारेगाव यांच्या अखत्यारीत येतो. विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कच्या बातमीचा प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि त्यानंतर विभागाने तातडीने दखल घेत करणवाडीकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. त्यामुळे नागरिकांनी काहीअंशी समाधान व्यक्त केले आहे.

मात्र केवळ तात्पुरती डागडूजी न करता दर्जेदार व टिकाऊ स्वरूपाचे काम करण्यात यावे, अशी ठाम अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये अशी जोरदार मागणी होत आहे.

वेळीच दखल घेतल्यामुळे संभाव्य अपघात टळण्यास मदत होणार असून, लोकहितासाठी आवाज उठवणाऱ्या विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्कच्या प्रभावी पत्रकारितेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर