ब्रेकिंग न्यूज
Thane ATS News | Namira Khanने बनावट पासपोर्टमध्ये दिलेल्या पत्त्यावर नेमकं कोण राहतंय? | Tariq Khan Vaibhav Sooryavanshi : बुमराहने थोडीही दयामाया दाखवली नाही! 5 बॉल यॉर्करवर यॉर्कर अन् वैभव पायाचा अंगठा वाच… Nagpur : शेअर मार्केटमध्ये झाला लॉस, बँक लुटून केला खर्च ‘कव्हर’, B.SC ग्रॅज्युएट तरुण चोर बनला कसा? VIDEO पंढरपूरमधील माजी सैनिकाची किमया, पशुपालनातून मिळवतोय महिन्याला 1 लाख उत्पन्न, सांगितला यशाचा मंत्र, Video Manoj Jarange Pati आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात Ajay Barskar यांची ED कडे तक्रार घोडदरा येथील दादाजी गोविंदा दुमोरे यांचे निधन मातीशी नातं, सर्जा-राजाशी ऋणानुबंध! कपाशीवर फवारणीचा जोर; विषबाधेचा धोका वाढला! घराला CCTV लावले अन्… जामिनावर सुटलेल्या ‘मुजीब डॉन’चं भयंकर कांड, शेवटी पोलिसांनी उचललंच, छ. संभाजीनगरात… Hingoli Crop Loss News | सोयाबीन वाळलं! चक्क सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवला
SP News Maregaon

आईवडील पंढरीला गेले, मागे विवाहित तरुणाने नको ते केले, विहिरीकाठचे दृश्य पाहून सगळेच हादरले, सोलापुरात खळबळ…

12 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर: आईवडील आषाढी वारीत खेळणी विकण्यासाठी पंढरपूरला गेले. मागे 25 वर्षीय विवाहित तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे धक्कादायक घटना घडली. टॉवेलमध्ये दगड बांधून विहिरीत उडी घेऊन कालिदास अण्णा इंगोले (वय 25, रा. अजनाळे) याने जीवन संपवले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेने इंगोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालिदासचे आई-वडील आणि चुलते आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथे खेळणी विक्रीसाठी गेले होते. कालिदास हा गावातच मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास कालिदास पत्नी पूजा हिला काहीही न सांगता घरातून निघून गेला होता.

घरात वाद झाला अन् आई लेकीला घेऊन रागात बाहेर पडली; रविवारी पहाटे ते दृश्य पाहून सगळेच हादरले

​सायंकाळी 5 वाजेपर्यंत तो घरी न परतल्याने पंढरपूरहून आलेल्या आई-वडिलांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनवर रिंग जात होती, मात्र कालिदास प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी गावात शोध घेण्यास सुरुवात केली.

शोध सुरू असताना श्रीरंग कोळवले यांच्या विहिरीच्या काठावर कालिदासची चप्पल आणि मोबाईल आढळून आला. संशय आल्याने कांतीलाल कोळवले यांनी विहिरीच्या पाण्यात शोधाशोध केली असता, अंगाला टॉवेलमध्ये दगड बांधलेल्या अवस्थेत कालिदास सापडला.

​कालिदास याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी चुलते गिरीधर नाथबाबा इंगोले यांनी सांगोला पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर