ब्रेकिंग न्यूज
मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं
SP News Maregaon

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार.

82 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कोसारा येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील कोसारा गावा पासून काही अंतरावर वर्धा नदीच्या पुला जवडील टर्निंगवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 12 जानेवारी 2023 रोज गुरुवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उगडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की.
सुहास उर्फ गोलु गजानन आडे वय सुमारे 18 वर्षे असे अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव असुन तो बुरांडा (हेटी) ता.मारेगांव जि. यवतमाळ येथील रहिवासी आहे.तो काल दिनांक 11 जानेवारी 2023 रोज बुधवारला बोरी (माढेळी)ता.वरोरा जि.चंद्रपूर येथे आबाजीच्या गावाला देवकारनाच्या कार्यक्रसाठी गेला होता.

तेथील कार्यक्रम आटपवुन तो रात्रीच्या सुमारास स्वतच्या गावाला बुरांडा (ख)येथे MH 29.AA5028 फॅशन प्रो या दुचाकी वाहनाने वापस येत असतांना अज्ञात वाहनाने धडक देऊन पसार झाला.या अपघातात दुचाकीस्वार दुचाकीसह रोडच्या कडेला असलेल्या नालित कोसळला रात्रीची वेळ असल्याने ही घटना ये- जा करणाऱ्याच्या निदर्शनास आली नाही.पण आज दिनांक 12 जानेवारी 2023 रोज गुरुवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास काही लोकांच्या लक्षात येताच ही घटना उगडकीस आली.

या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली.असुन मृतकाच्या पश्चात आई, वडील असा आप्तपरीवार आहे.या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला असुन पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात शुंकुरवार जामदार करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर