ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

घोडदरा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात संपन्न

6 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथे ब्रम्हलिन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ व श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ, घोडदरा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान तीन दिवसीय पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

हनुमान मंदिर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर, घोडदरा येथे हा सोहळा श्रद्धा व भक्तीमय वातावरणात पार पडला.या सोहळ्यात ग्रामगीतेच्या विचारांतून मानव जीवन सुखी व उन्नत व्हावे, स्वच्छता, व्यसनमुक्ती, सुसंस्कार आणि राष्ट्रधर्माची प्रेरणा नवयुवकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमात सामुदायिक प्रार्थना, ध्यान, ग्रामगीता वाचन, रामधून, पालखी सोहळा, ग्रामसफाई अभियान तसेच किर्तन व भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. प्रा. आकाश महाराज ताविडे (M.A. Music, NET) तसेच ह.भ.प. दत्ता महाराज जरंगकर यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.

या प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. संजयभाऊ देरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच माजी जि. प. सदस्य श्री.अनिल पाटील देरकर, गुरुकुंज मोजरी प्रतिनिधी श्री. सुधाकर पाटील धानोरकर, तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी, महिला मंडळाच्या कार्यकर्त्या व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दि. १० फेब्रुवारी रोजी महाप्रसाद सहभोजनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामवासी घोडदरा, गुरुदेव सेवा भजन मंडळ व महिला भजन मंडळ यांनी परिश्रम घेतले. भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर