ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गावोगावी सभा व चर्चासत्रे घेऊन गुलाबी बोंड अळी व रब्बीपूर्व मार्गदर्शन : कृषि विभागाचा उपक्रम

182 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकरी सभा व चर्चासत्रांच्या माध्यमातून गुलाबी बोंड अळी नियंत्रण तसेच हरभरा, तुर व रब्बी पिकांच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्यावतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

तालुका कृषि अधिकारी कु. दिपाली खवले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, उपकृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांच्या सहकार्याने ही माहितीपर मोहीम गावोगावी आयोजित करण्यात आली आहे. या सभांमधून शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन, हरभरा व गहू पिकावरील बीजप्रक्रिया, तसेच रब्बी हंगामातील पिकांचे तांत्रिक मार्गदर्शन देण्यात येत आहे.

नुकत्याच हिवरा मजरा येथे पार पडलेल्या सभेत मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी कापूस पिकावरील बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन, हरभरा पिकावरील मर रोग, घाटे अळी व कटवर्म नियंत्रण, तसेच तुर पिकावरील विविध कीड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी ‘महाविस्तार एआय’ अ‍ॅपचा प्रभावी वापर, फळबाग लागवड, कृषि अन्न प्रक्रिया उद्योग व विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली.

सहायक कृषि अधिकारी नकुल थोरात यांनी सभेचे नियोजन करताना कृषि विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. या वेळी गावातील प्रगतीशील शेतकरी पुरुषोत्तम बुटे, अनंत निब्रड, दिवाकर गाडगे, विनोद ढेंगळे, कृषि सखी अंजली गाडगे, सुषमा ढेंगळे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर