ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

येडशी येथील उपसरपंचावर मधमाश्यांचा हल्ला

56 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी येथे उपचारा दरम्यान मृत्यू

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील येडशी गावातील एका इसमावर मधमाश्याने हल्ला करून ठार केल्याची घटना आज दिनांक 25 एप्रिल 2022 ला सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.हा इसम येडशी गावातील ग्रामपंचायत उपसरपंच असून त्यांचे नाव भोला महादेव नगराळे असून त्यांचे वय सुमारे 40 वर्षे आहे.

आज सोमवार ला सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.त्यांची आई विमल महादेव नगराळे हे सोसायटीच्या निवडणूकी मध्ये उमेदवार म्हणून उभी होती.त्यांनी विजय सुद्धा निश्चित केला मात्र गावात खुशी चे वातावरण असतांना पेढे आणण्यासाठी गेलेल्या येडशी येथील उपसरपंच भोला नगराळे यांच्या वर अपना देशी बार समोर एका झाडाला असल्येला (आग्याच्या) मधमाश्या ने हमला करून त्यांना गंभीर जखमी केले.

ही बाब त्यांच्या सभोवतालच्या मित्र मंडळींना माहीत होताच त्यांनी धाव घेतली तिथे ते पडून असल्याचे दिसून आले.अश्यातच त्यांना सरकारी दवाखाना मुकुटंबन येथे नेण्यात आले व त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना वणी येथे रेफर करण्यात आले.मात्र वणी येथे उपचारा दरम्यान  हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.त्यांच्या मागे पत्नी,आई,वडील,मुलगी,मुलगा असा आप्त परिवार असून घरचा कर्ताधर्ता च निघून गेल्याने परिसरात व गावात शोककळा पसरली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर