ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

निंबादेवी येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवस संपन्न.

74 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्वारी,बाजरी राजगिरा या पिकाच्या लागडीचे क्षेत्र वाढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
       [88059 79173]

झरी जामणी मकर मकर संक्रांत भोगीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय कृषी अधिकारी पांढरकवडा यांचे मार्गदर्शनाखाली
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, झरी जामणी यांच्या वतीने शनिवार दिनांक १४ जानेवारी निंबादेवी येथील गंगाधर धुर्वे यांच्या शेतात तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या दिवशी गावात पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात आला.तालुका कृषी अधिकारी अमोल आमले यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्वारी,बाजरी,राजगिरा या पिकांचे मानवाच्या जीवनातील महत्व व त्यामध्ये असणारे पोषण मूल्याची माहिती सांगितली तसेच तालुक्यामध्ये ज्वारी,बाजरीचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून त्यावरील प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घटकांची माहिती दिली.

कृषी सहाय्यक पांडुरंग ताटे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व संबंधित योजनेचे अर्ज जागेवर भरून घेण्यात आले. प्रसंगी निंबा देवी टेंभी गावातील शेतकरी व बचत गटातील महिला, तालुका कृषी अधिकारी अमोल आमले,कृषी पर्यवेक्षक फुलझेले,कृषी सहाय्यक सुधीर मोघे,पांडुरंग ताटे,नरेंद्र कांबळे, मनोज कोरांगे उपस्थित होते.उपस्थित शेतकऱ्यांना पौष्टिक जेवण बाजरीची भाकरी व झुणका-चटणी याची सोय करण्यात आली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर